Enter your Email Address to subscribe to our newsletters
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब) याला मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३ हजार ६२६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Read More
आजकाल राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, काही रिकामटेकडे लोक समाजमाध्यमे आणि वाहिन्यांवरून प्रकाशझोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि आपले हसेच करून घेतात. अशी काही स्टंटबाजी केली की, आपण नेते बनतो किंवा आपल्या ‘गॉडफादर’च्या मर्जीत राहतो, असा या दीडशहाण्यांचा भ्रम. मग केवळ उपद्रव माजविणे, एवढे एकच आपले कर्तव्य, असा समज लोकांमध्ये रुजविण्याचा घातक प्रयास अशा मंडळींनी सुरूच ठेवला आहे. वस्तुतः यातून काहीही साध्य होत नाही. ना जनतेचे प्रश्न हे लोक सरकार दरबारी नेऊन सोडवू इच्छितात आणि ना त्यातून आपल्
पुण्यातील माण हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. सोमवारी माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा त्यांनी मंत्रालयात आढावा घेतला.
हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची गती वाढविण्यासाठी आता ‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे.
पुणे महानगर चहूबाजूंनी वेगाने विकसित होत आहे. त्याचबरोबर आता मेट्रो सेवेलाही चहूबाजूंनी विस्तारण्याचे वेध लागले आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. त्याच कार्यक्रमात प्रस्तावित नव्या मेट्रो लाईन्सचे सूतोवाचदेखील झाले होते. आता त्याच्या आराखड्याची तयारी होत आहे. त्याचसोबत जे मार्ग मंजूर झाले आहेत आणि ज्यांची कामे प्रत्यक्ष भूमिपूजनानंतर सुरू झाली आहेत, ती वेगवेगळ्या टप्प्यांत आहे.
पुण्यातील गजबजलेल्या बाणेर-पाषाण रस्त्यावरील संस्थेजवळ मेट्रोचे पत्रे लावण्यासाठी काम सुरू असतना खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आल्याचे वृत्त आहे. हॅन्ड ग्रेनेड ब्रिटिश कालीन असल्याचे समजते मेट्रोकडून पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली.त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला असून कोणतेही भीतीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.
मेट्रोत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महा-मेट्रोकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मेट्रोअंतर्गत १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा-मेट्रो अंतर्गत रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
'पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’ अर्थात ‘पीएमपीएमएल’चे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) गेल्या १६ वर्षांत १९ वेळा बदलले, अशी आकडेवारी पुढे आली आहे.
पुणे मेट्रोने ऑगस्ट महिन्यात एकूण ३ कोटी, ७ लाख, ६६ हजार, ४८१ कोटी रुपयांचा महसूल जमा करीत, पुणे शहरासाठी मेट्रोची ही सेवा किती आवश्यक आहे, यावरच शिक्कामोर्तब केले. दररोज सरासरी ६५ हजार, ८२२ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. स्वातंत्र्य दिनी सर्वाधिक म्हणजे ८५ हजार, ३२३ प्रवाशांची नोंद झाली. पुणे मेट्रो अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही.
पुण्यातील वाहतूककोंडीवर गेल्या दीड-दोन वर्षांपासून वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. तसेच वाहूतककोंडीमागील कारणांचाही शोध घेतला जात आहे. शहरातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन हजारो सूचनाही पुणेकरांनी दिल्या. नवीन उड्डाणपूल उभारले गेले. रस्तेदेखील विस्तारले. तरीही काही भागात स्थिती जैसे थे असल्यामुळे ही समस्या आहे, तशीच दिसून येते.
पुणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असून येत्या काही दिवसातच पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक आणि वनाझ मेट्रो स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक पर्यंत थेट प्रवास करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यात या मार्गांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन जुळ्या शहरे मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. दरम्यान, हे मेट्रो मार्ग आता लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.
मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबई महानगर क्षेत्रातील एकूणच वाहतुकीची परिस्थिती सुधारायची असल्यास मेट्रोचे जाळे विस्तारणे, सक्षम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण, मेट्रो रेल्वेसंबंधी कामे कोरोनाच्या कारणास्तव आणि कारशेडच्या प्रश्नामुळे काहीशी संथपणे सुरू होती. पण, आता राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर या मेट्रोेचा कारभारही पुन्हा गतिमान झाला आहे. तेव्हा, मुंबईतील विविध मेट्रो मार्गांची नेमकी सद्यस्थिती विशद करणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यातील बहुचर्चित मेट्रोसेवेचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी त्यांनी दिव्यांग मुलांसोबत मेट्रोचा प्रवाससुद्धा केला
"रशिया- युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय वियार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी सुरु केलेले 'ऑपरेशन गंगा' हे भारतीय सामर्थ्याचे प्रतीक आहे" असे कौतुकोद्गार पंतप्रधान मोदी यांनी पुण्यात काढले
अपूर्ण मेट्रोचे उद्घाटन नको, असा आक्षेप घेणारे शरद पवार यंदाच्या जानेवारीत काय करत होते? तर हवेतून चालणार्या पुणे मेट्रोतून प्रवास करत होते. कारण, मोदी अपूर्ण मेट्रोचे उद्घाटन करत असतील, तर शरद पवार त्यावेळी नक्कीच रुळावर चालणार्या मेट्रोत उभे राहिले नसतील! म्हणजेच, आपण काय बोलतो आणि काय करतो, याचेही भान शरद पवारांना राहिले नसल्याचे यावरुन म्हणावे लागेल.
हिंजेवाडी आयटी पार्क ते पुण्यातील शिवाजीनगर दरम्यान असलेल्या पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा पुण्याचे लोकसभा खासदार गिरीश बापट यांनी दिला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त सुहास दिवसे यांची गिरीश बापट यांनी नुकतीच भेट घेतली त्या वेळेज गिरीश बापट यांनी हा आंदोलनाचा इशारा दिला. हिंजेवाडी आयटी पार्कला अनेक माहिती तंत्रद्यान क्षेत्रात काम करणारे लोक प्रवास करत असतात. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेची सुरुवात येथूनच होणार
पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचे काम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पुणे मेट्रोच्या एकूण ३ मार्गिका असणार आहेत. त्यातील पहिल्या दोन मार्गिकांचे काम ( पिपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी) ''महामेट्रो'' बघणार आहे, तर पुणे मेट्रो प्रकल्पातील तिसऱ्या मार्गाचे काम ''पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'' (पीएमआरडीए) बघणार आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाकरता लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतराचे काम नुकतेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आत्तापर्यंत ४५% काम पूर्ण झाले आहे.पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी बरोबर एकवर्षांपूर्वी मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.
पुणे मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या १२ कि.मी. लांबीचा मार्ग मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार
स्वारगेट ते शिवाजीनगर ऍग्रीकल्चर कॉलेज येथे मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी काम चालू असताना, अचानक जमीन खचून तिथे १० फुटाचा खड्डा पडला. यानंतर अधिकाऱ्यांनी खड्डा का पडला याची तपासणी केली असता त्यांना ही भुयारे आढळून आली. या भुयारांची या अगोदर कोठेही नोंद नसल्याने ही ही भुयारे किती जुनी आहेत याची माहिती मिळू शकली नाही.