Cannines

पहिल्याच दिवशी दहावीच्या परीक्षेला गालबोट! जालन्यात मराठीचा पेपर फुटला

(Jalna ) राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. एकीकडे कॅापीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत या पेपरच्या प्रती झेरॅाक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Read More