Clean Environment

मनसेच्या धास्तीने ठाण्यात भोंग्याविना नमाज पठण

भोंगे उतरले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी (दि. ४ मे) पहाटेपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कलम १४९ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ अन्वये तब्बल १ हजार ७७५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर, आयुक्तालय क्षेत्रातील सुमारे ३५० जणांना ताब्यात घेण्यात आले. मशिदीच्या विश्वस्तांना पहाटेच्या वेळी भोंग्याचा वापर करून नमाज पठण करू नये असे आवाहन पो

Read More