विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने काल सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.
Read More
मुंबई आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचे क्षितीज विस्तारणारी आणि नव्या विचारांची ओळख लोकांना करुन देणाऱ्या वसंत व्याख्यानमालेची सुरुवात आज दि. १२ एप्रिल पासून होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची मुलाखतीने या व्याख्यानमालेची सुरुवात होणार असून, राजीव जोशी आणि नेहा खरे अभिनेते अशोक सराफ यांच्या कला जीवनाचा प्रवास उलगडणार आहेत.
विनोदवीर, टायमिंगचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट पाहिलेला आणि त्यांचा चाहता नसलेला एकही मराठी प्रेक्षक सापडणार नाही. अनेक सुपरहिट मराठी चित्रपट, नाटक देणाऱ्या लक्ष्मीकांत यांचा पछाडलेला हा चित्रपट शेवटचा ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री नीलम शिर्के यांनी नुकत्याच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव सांगितले.
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसतसे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट महाराष्ट्रभरात २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. २० वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचाम चाहता वर्ग साहजिकच दुसऱ्या भागाकडे वळला आणि तो त्यांना आवडला देखील. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करताना दिसत असून ‘नवरा माझा नवसाचा २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.
दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला ७.४४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं "डम डम डम डम डमरू वाजे...." हे गाजलेलं गाणं "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. "डम डम डम डम डमरू वाजे...." या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे.
सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'साडे माडे तीन' या चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या कुरळे ब्रदर्सच्या तिकडीने बॅाक्स ॲाफिसने धुमाकूळ केला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. त्यामुळे या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी '
'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट, त्यातील पात्र आणि गाणी यांनी प्रेक्षकांना २४ वर्षांनंतरही भूरळ घातली आहे. आजही डोहाळं जेवण असेल तर कुणी तरी येणार येणार गं हे गाणं वाजल्याशिवाय तो कार्यक्रम पुर्ण होत नाहीच. या गाण्याची विशेष खासियत म्हणजे अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा स्त्रीभूमिकेतील डान्स. आणि पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी या गाण्यावर चित्रपटाची टीम पुन्हा एकदा थिरकताना दिसली आहे.
तब्बल १९ वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या "नवरा माझा नवसाचा" ह्या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला. नुकतेच ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने आजवर मालिका, चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आई कुठे काय करते या मालिकेत तिने अगदी साधा, सरळ स्वभाव आणि काहीही करून दाखवण्याची जिद्द असलेल्या अरुंधतीची भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांना भावली. पण १९ वर्षांपुर्वी मधुराणीने अरुंधतीच्या उलट भूमिका 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात साकारली होती. यात ती व्हिजेच्या भूमिकेत दिसली होती. आता 'नवरा माझा नवसाचा २'च्या निमित्ताने मधुराणीने तिच्या त्
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा'. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या कथेने, प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता पुन्हा एकदा भक्ती आणि वक्रतुंड नवा नवस फेडायला निघाले आहेत. २० वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा २ येत असून या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या अनेक चित्रपटांच्या यादीत 'अशीही बनवाबनवी' हा चित्रपट नक्कीच येतो. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. त्यामुळे अशीही बनावाबनवीचा सिक्वेल येणार का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी अभिनेते सचिन पिळगांवकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सप्ष्टपणे उत्तर दिले आहे.
विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल २०२४ रोजी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांच्या यादीत अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) याच्या गालिब नाटकाचा देखील विशेष सन्मान करत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चिन्मय (Chinmay Mand
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट २००४ रोजी प्रदर्शित झाला होता. आजही २० वर्षांनी तो चित्रपट प्रेक्षकांना पाहताना आनंद होतो. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट भेटीला येणार असून आता नवस फेडायला वक्रतुंड अर्थात वॅकी आणि भक्ती कुठे जाणार आणि यावेळी सहप्रवाशांसोबत काय धमाल मस्ती होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ अभिनेते जयवंत वा
नवस फेडण्यासाठी सामान्य माणसांना काय काय करावं लागतं याचं उत्तम उदाहरण देणारा चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha). दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी २००४ साली ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणून मनोरंजनाची आणखी एक पायरी सर केली होती. आजही २० वर्षांनी हा चित्रपट, त्यातील प्रत्येक पात्र लोकं आवडीने पाहतात. काही दिवसांपुर्वी याच चित्रपटाचा पुढचा भाग ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी
मराठी भाषेचा गौरव आणि आदर प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज याच दिवसाचे औचित्य साधत चित्रपट, नाटक, मालिका, संगीत अशा अनेक माध्यमांमध्ये तयार होणाऱ्या मराठी कलाकृती प्रेक्षकांना एकाच ॲपमध्ये मिळाल्या पाहिजेत असा अट्टहास करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली 'तिकीटालय' हे मराठमोळं ॲप प्रेक्षकांच्या सेवेत आले असून आज दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात या ॲपचे उद्घाटन महाराष्ट्र भू
“मराठी प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर न पाहता येण्यासारखा आशय जर असेल तरच ते चित्रपट किंवा नाट्यगृहात जाऊन गर्दी करतील. त्यामुळे जुन्या संकल्पनांची कात टाकून नव्या कल्पना रुजू करणे अत्यंत महत्वाचे आहे”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, लेखक यांना महत्वाचा सल्ला दिला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराटी रसिक प्रेक्षकांना सोयीसाठी ‘तिकीटालय’ हे ॲप ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक म
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, गुरूवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौर
मराठी चित्रपटसृष्टीला ७०-८० च्या दशकात नवसंजीवनी देणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव अग्रस्थानी येते. आजवर अनेक विनोदी चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी जोडी अशोक सराफ आणि सचिन पिळगावर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज झाले आहेत. २० वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'नवरा माझा नवसाचा २'च्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.
दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ईशान्य मुंबई ‘दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त साधून रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी ’दैवज्ञ रास गरबा’चे आयोजन करण्यात आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सविता मालपेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी अशोक सराफ, सविता मालपेकर आणि दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांचे छायाचित्र असलेल्या ‘टपाल तिकिटा’चे प्रकाशन करण्यात आले. भारतीय पोस्ट खात्याच्या ‘माय स्टँप’ योजनेअंतर्गत टपाल तिकीट प्रकाशन करण्यात आ
नाटक, मालिका आणि चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल महत्वाचे विधान केले आहे. 'मित्रम्हणे' या सौमित्र पोटे युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काही दिवसांपुर्वी त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना पुरस्कारांसोबत कामं देखील मिळायला हवी असेही वक्तव्य केले होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणजे दादा कोंडके. त्यांच्या विनोदांना खरंच जगात तोड नाही. अभिनयात एकवेळ प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं पण खळखळून हसवणं अवघड असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. त्यामुळे विनोद आणि त्या विनोदाचे अचूक टायमिंग साधणाऱ्या अभिनेत्यांचे वर्णन दादा कोंडके या नावाशिवाय अपुर्णच आहे. एक काळ होता की दादा कोंडके यांनी हिंदी चित्रपट निर्मात्यांनाही घाम फोडला होता. अभिनय, दिग्दर्शन, संवादलेखन, निर्माता अशा प्रत्येक भूमिकेत दादा कोंडके यांनी अशी काही जादू केली होती की त्या काळातील बड्य
“महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणार्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल,” अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे दिली जाणारी ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे’ शिष्यवृत्ती ही यावर्षी इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
"बाईपण काय भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण, पुरुषांचं भारीपण कुणी दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कुणी गवगवा करत नाही कधी. स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात," असं अशोक सराफ म्हणाले.
अभिनय क्षेत्राला अंत नाही, जेवढे कराल तेवढे कमी आहे. शिक्षण घेऊन अभिनय येतो, यावर माझा तितकासा विश्वास नाही.
आपल्या अभिनयातून सर्वांना मनसोक्त हसवणारे हास्यसम्राट अशोक सराफ यांना आज ४जून रोजी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली, तर त्यांच्या कारकीर्दीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे
केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन घडवणारे चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेते म्हणजेच ‘अभिनयसम्राट’ अशोकमामा सराफ...
विनोदी आणि गंभीर भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे ८८ व्या वर्षी पुण्यामध्ये निधन
‘हम पांच’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
१६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अकाली एक्झिट घेतली. आज त्यांचा १४वा स्मृतिदिन...
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे हे दोघे दिग्गज कलाकार पहिल्यांदाच मराठी सिनेमात प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटाची कथा काय असणार आहे. याबाबत दिग्दर्शकाने न दाखवता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे
आज गुरु पौर्णिमा. आजचा दिवस हा आपण सगळ्यांसाठीच खास आहे. आजच्या दिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी आपल्या गुरुंच्या आठवणीत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. मात्र आजच्या या खास दिवशी सिनेसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंचे आभार मानले आहेत.