Digital

‘रायगड ते इंद्रप्रस्थ’ !अभाविपतर्फे ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘रायगड ते इंद्रप्रस्थ’ (दिल्ली) अशी ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ काढण्यात येणार आहे.देशाची राजधानी येथे ७ ते १० डिसेंबर या कालावधीत अभापविपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी अभाविपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘हिंदवी स्वराज्य यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकारपरिषदेत देण्यात आली.

Read More