डॉ. बाबासाहेबांचा महाड चवदार तळ्यापासून सुरू झालेला लढा ज्ञानसंपन्न होण्याच्या दिशेने नेला पाहिजे. एका व्यक्ती विरुद्ध उभा केलेला लढा समाजाला क्षणिक समाधान देणारा, परंतु पदरात काहीच न टाकणारा असतो हे समजून घेतले पाहिजे.
Read More
संभाजीराव भिडे गुरूजींची अटक व त्यांच्याबाबत असलेले पुरावे याबद्दल भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आदल्या दिवशी जे सांगितले तेच दुसऱ्या दिवशी विधानसभेत सांगितले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या काळामध्ये कसलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीएसटी ते विधानसभेपर्यंतच्या परिसरात जागोजागी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
मोदींचे भिडेंबरोबर अत्यंत जवळची संबंध आहेत, त्यामुळे भिडेंना अटक होऊ नये, म्हणून स्वतः मोदी भिडेंना पाठीशी घालत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांची भेट घेऊन भारिपच्या मागण्यांवर चर्चा करेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
श्रीमंत कोकाटेसारख्या जातीयवादी व्यक्तीला सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर खुद्द बाबासाहेबांच्या विचारांनाच हरताळ फासण्याचे काम करीत आहेत. ‘एक विरुद्ध दुसरा’ उभे करण्याचे हे राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे.