राज्यात पुन्हा भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) सत्ता आल्यास मुस्लिमांसाठी स्वतंत्र आयटी पार्क सुरू करण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केली आहे. याद्वारे केसीआर यांनी मुस्लिम लांगुलचालनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Read More
तेलंगणचे आपणच अनभिषिक्त राज्यकर्ते आहोत, या राज्यात इतरांनी शिरकाव करू नये, अशी प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगणारे तेथील मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव तथा केसीआर. तेलंगणमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, केसीआर यांनी सत्तेत आल्यास चक्क अल्पसंख्याकांसाठी आयटी पार्क उभारणार असल्याची सवंग घोषणा करुन टाकली.
अनेक मराठी कलाकार राजकीय पक्षात प्रवेश करताना गेले काही दिवस दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीत काही महिन्यांपुर्वी प्रवेश केलेल्या अभिनेत्री मेघा धाडेवर एका महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महाराष्ट्र भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजकपदी अभिनेत्री मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आली आहे. मेघाने जून महिन्यात भाजपामध्ये प्रवेश करून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
राज्यावर भीषण वीज संकटाचे काळे ढग घोंघावत आहेत. अघोषित भारनियमनामुळे उद्योग बंद पडतील अशी स्थिती आहे. पण कुण्या नेत्याच्या घरी धाड पडली म्हणून थेट पंतप्रधानांच्या घराचा उंबरठा ओलांडणारे लोकनेते आज ऊर्जा मंत्र्यांच्या बाजूने का उभे राहत नाहीत ? असा गंभीर प्रश्न माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.