शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा द्य
Read More
बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या ‘विशेष सघन पुनरावृत्ती’ (Special Intensive Revision) प्रक्रियेत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, असा महत्त्वपूर्ण संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या निवडणुकीत आधार ओळखपत्र वगळण्याच्या निर्णयाबाबत उत्तर देण्याचे निर्देश गुरुवार दि. १० जुलै रोजी भारतीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे घर काही मिळाले नाही. आगामी मुंबई पालिकेची निवडणूक आणि मराठी मतांच्या बेगमीसाठी काल उद्धव ठाकरेंचा गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या आंदोलनात फुकाचा कळवळाच दिसून आला.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीसंदर्भात मतदारांची बूथ निहाय्य किंवा विशेष गहन पुनरावृत्ती(Special Intensive Revision) करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिक मंगळवार, दि. ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आठ विरोधी पक्षांनी दाखल केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये बिहारमधील महिलांना सरकारी ३५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची यादी तयार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली. या याचिकांवर येत्या १० जुलै रोजी सुनावणी होईल.
२०१९ साली प. बंगालच्या संदेशखालीमध्ये उसळलेल्या दंगलीत तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. हे हत्या प्रकरण साहजिकच ममता सरकारच्या विस्मृतीत गेले असले, तरी आता ‘सीबीआय’कडून या प्रकरणी कठोर तपास केला जाईल. दुसरीकडे कर्नाटकात घडलेली देवतांच्या मूर्तींची विटंबना असेल किंवा बिहारमध्ये मोहरम निवडणुकीवेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, यासांरख्या घटनांमध्ये सहभागी हिंदूविरोधी समाजघटकांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे.
मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा आणि हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या, असे खुले आव्हान मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधला.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला असून, कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथीचे आणि पक्षाने दाखविलेल्या विश्वासाचे मनापासून आभार मानले आहेत.
(Harshwardhan Sapkal) "आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार रविवार दि. २९ जून रोजी पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारने हिंदूंना आकर्षित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वी दिघा येथील जगन्नाथ मंदिराचा प्रसाद राज्यभर वाटण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पूर्व वर्धमान जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील प्रकरणही समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील मुस्लिम आणि हिंदू विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या माध्यान्न भोजनात भेदभाव केला जायचा. प्रकरण समोर आल्यानंतर हिंदूंमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेश
पुढील वर्षी होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजपची सहयोगी संघटना ‘हिंदू मुन्नानी’ने पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत हिंदूंना आपल्या मतांची ताकद दाखविण्याचे आवाहन केले आहे. या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनेने आयोजित केलेल्या भगवान मुरुगन भक्त संमेलनात ‘हिंदू मुन्नानी’ने ‘हिंदू एकता’ आणि हिंदूंच्या हक्कांचे आणि मंदिरांचे रक्षण करण्याचा ठरावही मंजूर केला. त्यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीत मुरुगनचा आशीर्वाद भाजपला मिळणार का, हे पा
काँग्रेस काय किंवा वंचित बहुजन आघाडी काय, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, त्यातून बोध घेण्याऐवजी पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’सहित निवडणूक आयोगावर फोडून मोकळे झाले. राहुल गांधींनी केवळ समाजमाध्यमांवर अफवांचे बाजार भरवले. पण, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी हा विषय न्यायालयात नेऊन हसे करून घेतले. महाराष्ट्रातील मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळलाच; शिवाय पुराव्यांअभावी हे आरोप टिकू शकत नाहीत, हेही ठामपणे सांगितले. आता या निर्णयावरही विरोधकांनी नाराजी व्यक्त
०२४मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार, दि. २५ जून रोजी फेटाळून लावली. चेतन अहिरे यांनी वंचित पक्षाचे अध्यक्ष वकिल प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५ लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवनंतर तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील टक्केवारीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
कोणत्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय? जागावाटपाची समीकरणं काय आहेत? बिहारच्या राजकारणात काय घडतंय?
स्वबळाच्या सप्तरंगी चर्चा या महाराष्ट्रासह बिहारच्या राजकारणालाही तशा नवीन नाहीत. यंदाही आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी हौशे, नवशे, गवशांनी बेटकुळ्या फुगवून स्वबळ आजमवण्याच्या राणाभीमदेवी थाटात गर्जना केल्या आहेत. त्यानिमित्ताने बिहारमधील स्वबळाच्या राजकीय जत्रेचा वेध घेणारा हा लेख...
राज्यभरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना शरद पवारांनी याबाबत एक विधान केले आहे. मंगळवार, १० जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांची तयारी अखेर सुरू झाली आहे. राज्य सरकारने सोमवार, दि. 10 जून रोजी मुंबईसह राज्यातील सर्व ’अ’, ’ब’, ’क’, ’ड’ वर्ग महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून लवकरच नागरिकांना नवे लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे.
राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावर बावनकुळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागल्या तरी भाजप आणि महायूती तयार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असून या निवडणूका महायूती एकत्रित लढणार की, वेगवेगळ्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
three countery elections is the influence of Trump on American politics मागील काही दिवसांत अमेरिकेचे तीन मित्रदेश असलेल्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ऑस्ट्रेलिया सोडल्यास कॅनडा आणि जर्मनीमध्ये नवीन चेहर्यांच्या हाती देशाची धुरा नागरिकांनी सोपवली. पण, या तिन्ही निवडणुकांमधील आणखीन एक साम्य म्हणजे ट्रम्प यांच्या अमेरिकन राजकारणाचा प्रभाव.
र्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश, मंगळवार दि. ६ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंहित निवडणूका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याच्या सुनावणी दरमान्य दिले आहेत.
(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प
( Twist in Legislative Council elections ) विरोधकांकडे एकही आमदार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना, नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. सोमवार, दि. १७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या दि. २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
दि. कुर्ला नागरिक सहकारी बँकेची निवडणूक दि. १६ मार्च रोजी नियोजित आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने शासकीय नियमाला बगल देत शाखा निहाय निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. हे गंभीर असून, ही निवडणूक तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सहकारी निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या नियम ३ (ह) नुसार, मतदान केंद्रे अधिक संख्येने व सोयीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधि
(Maharashtra Legislative Council Elections 2025) राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जर्मनीत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे फ्रेडरिक मर्झ जर्मनीचे अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. युरोपातील जर्मनीचे स्थान बघता, एकूणच युरोपच्या भवितव्यावर परिणाम घडवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकातील निकालांचा आणि संभाव्य परिणामांचा घेतलेला हा आढावा...
भारतात सत्तापालटासाठी ‘युएसएड’चा वापर झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप अर्थहीन ठरवित, काँग्रेसने या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.
२०२४च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या कामगिरीतून धडे घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी चमकदार ठरली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही लालू आणि काँग्रेसवर भाजप कुरघोडी करून विजयी होईल, हे निश्चित.
युरोपियन महासंघातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या जर्मनीमध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तेव्हा, या निवडणुकीत जर्मनीला भेडसावणार्या समस्यांना सामोरे जाणार्या पक्षाला तेथील नागरिक मतदान करतात की, पुन्हा एकदा विविध विचारसरणींचे पक्षच एकत्र येऊन खिचडी सरकार बनवितात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे या निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकेल, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार, असे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेली १० वर्षे असलेले दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर झाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे कृपया मला फोन करू नका, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
‘दिल्ली हैं दिलवालों की’ असा हा देशाच्या राजधानीचा स्वभावगुण. तेव्हा, यंदा दिल्लीकरांनी मतपेटीतून कुणाला आपला ‘दिल’ दिला आणि कुणाला दगा दिला, ते उद्याच्या शनिवारी स्पष्ट होईलच. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, ‘आप’विषयी नाराजी आणि मतांची टक्केवारी काय सांगते, याचा उहापोह करणारा हा लेख...
“दिल्लीत यंदा भाजपलाच बहुमत मिळेल,” असा अंदाज अॅक्सिस माय इंडिया च्या आणि ‘टुडेज चाणक्य’ या दोन मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी समोर आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांचे ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपलाच बहुमत दाखविण्यात आले आहे, तर आपला सत्ता गमावावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशात दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ( Delhi Elections ) जवळ येऊन ठेपल्या असून, उद्या यासाठी मतदान होणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव नीट साजरा व्हावा यासाठी अनेक यंत्रणांनी कंबर कसली असून, त्यांनी निवडणूक काळामध्ये रेवडी वाटपांना चाप लावण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.
Narendra Modi दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील दहावीच्या बोर्डाचे निकाल सुधारण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ते दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना म्हणाले आहेत.
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
(AAP Manifesto Delhi Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मध्यमवर्गीय लोकांना आकर्षित करण्यासाठी १५ हमी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून