'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
Read More
नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला', 'देवमाणूस', 'रानबाजार', 'अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तिने येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
व्हिएतनाममध्ये रामकथेचा सांस्कृतिक प्रभाव अत्यंत खोल असून, तेथील समृद्ध परंपरेचा तो एक भाग आहे. प्राचीन ‘चम्पा’ राजवंशाने भारतीय संस्कृतीशी असलेली आपली नाळ अधिक दृढ केली आणि रामकथेचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला. ‘चाम’ व ‘खमेर’ समाजांनी आपल्या नृत्यनाट्य परंपरांमधून, रामायणाच्या कथा आणि पात्रांना सजीव ठेवले. ‘त्रुयेन कियू’ आणि ‘रोबन याक’ सारख्या लोककला प्रकारांमध्ये रामकथेतील मूल्ये, नीतिकथा आणि आदर्श यांचे प्रभावी दर्शन घडते. बौद्ध संस्कृतीत देखील रामकथेची छाया जाणवते, जिथे प्रभू राम आदर्श पुरुष व धर्मनिष्ठ
शास्त्रीय नृत्यकलेची उपासना करताना सामाजिक भान जपत, आपल्या कार्यातून कुशल नृत्यांगना घडवणार्या संध्या दामले यांचा हा जीवनप्रवास
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतानाच आता त्याचे गाणेही आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. नुकताच अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे ‘आया रे तुफान’ या गाण्यावर जबरदस्त डान्स सादर करण्यात आला. प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलीब आणि रोहित गिजारे यांच्या टीमने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
आज ‘स्वर्णवंदना’ या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे भव्य आयोजन होत आहे. ज्यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून ही वंदना दिली जात आहे, त्या तपस्विनी ‘नृत्यार्पिता’ पं. मनीषा साठे यांच्याविषयी...
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच
माझे आणि राजेश्रीचे गेल्या काही वर्षांचे स्वप्न म्हणजे ‘त्रिवेणी.’ स्वा. सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित, स्वा. सावरकरांच्या साहित्यावर बेतलेला नृत्य, नाट्य, काव्य व निवेदनात्मक प्रयोग. खरेतर किती प्रयोग करायचे, कोठे करायचे, असे काहीच ठरलेले नव्हते, पण प्रयोग होत गेले. छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा...
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. बहिष्काराचा हा आदेश स्थानिक मौलानाने दिला आहे. पीडित कुटुंबाचा दोष एवढाच की, त्यांच्या निकाह समारंभात एका नर्तिकेने डान्स केला होता. बहिष्काराची घोषणा करणाऱ्यांनी याला धार्मिक प्रथांच्या विरोधात म्हटले आहे. कुटुंबाला समाजातून काढून टाकण्याची मुदत सध्या ११ महिन्यांवर ठेवण्यात आली आहे. यासोबतच कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
गौतमी पाटील कायम चर्चेत असते. पण सध्या ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या नृत्याच्या बऱ्याच व्हिडिओमुळे ती अडचणीत येत असते. आता पुन्हा एकदा त्याच कारमामुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीने तिच्या नव्या ‘आलं बाई दाजी माझं’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला असून अनेक मुलींसोबत तीदेखील पारंपरिक मराठी पोशाखात दिसत आहे. पण हे गाणं एका किल्ल्यामध्ये चित्रित झाले असल्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत.
कथ्थक नृत्य क्षेत्रामधील सुपरिचित नाव असलेले आचार्य डॉ. राजकुमार केतकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नटराज नृत्य निकेतन या शिष्यांच्या संस्थेने गडकरी रंगायतन येथे तथास्तू हा कार्यक्रम आयोजित करुन अनोखी मानवंदना दिली. कथ्थक नृत्य आचार्य डॉ. राजकुमार केतकर गुरुजींना गंडाबंध शिष्या कथ्थक नृत्य अलंकार प्रिती विद्याधर घाणेकर यांनी गुरुपुजन करुन गुरुदक्षिणा अर्पण करीत १११ विद्यार्थिनींसोबत नृत्यातून मानवंदना दिली.
साधारणतः गीत हर्षाचा पर्याय मानले जाते. हर्ष झाल्यावर साधारण मानव गीत-नृत्यादी पर्यायांचा अवलंब करतो किंवा करवितो. असल्या मानवाला स्वतःच गीत-नृत्यादी करता आल्यास त्याच्या कुवतीप्रमाने किंवा कल्पनेप्रमाणे तो झालेल्या हर्षाला गीत-नृत्यादीतून वाट मोकळी करून देईल. स्वतःचे गीत वा नृत्य इतरांच्या तुलनेने निम्नस्तराचे आहे, असे मनावर झालेल्या पूर्व संस्काराने त्याला वाटल्यास तो इतरांना नृत्य-गीतादी करावयास लावून स्वतःच्या हर्षाला द्विगुणित करण्याचा प्रयत्न करील, सात्विक वृत्तीचा किंवा साधू वृत्तीचा माणूस हर्ष झाल्य
‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्त सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याशी, कथ्थक, कथ्थक नृत्यासमोरील आजची आव्हाने, मर्यादा आणि त्यांचा एकंदर भरतनाट्यम् ते कथ्थक प्रवास, अशी केलेली ही मनमोकळी बातचीत...
प्रतिकूल परिस्थिती आणि कुठलेही व्यावसायिक नृत्यवर्ग, शिक्षण न घेता स्वत:च्या अंगभूत नृत्यकलेने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कोरिओग्राफर’ म्हणून करिअरला आकार देणार्या प्रशांत जाधवविषयी...
“ ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’ ही संस्था लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅक स्टेज कलावंत, नाटक, एकपात्री आणि चित्रपट अशा विविध कला घटकांसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा ’कलाभूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’चे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी दिली.
“कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना ठरावीक काळ आणि संयम आवश्यक असतो, तसेच शास्त्रीय कथ्थक नृत्यातही तुम्ही झोेकून देऊन विद्यार्जन करा, ‘रियाझ’ करा यश तुमचेच आहे,” असे विद्या देशपांडे आपल्या शिष्यांना सांगतात. नृत्य हे ‘नोबल करिअर’ आहे. नृत्यातून केवळ पैसाच नव्हे तर जागतिक कीर्ती, अनेक रसिकांचा आदर, गौरव, सन्मान आणि मुख्य म्हणजे ईशसाधनेची आध्यात्मिक संतुष्टीही मिळते, असे सांगणार्या विद्या देशपांडे म्हणतात की, “नृत्य माझा श्वास आहे आणि तीच ईश्वराला प्राप्त करण्याची साधना आहे.”
बालवयातच नृत्याचे धडे गिरवून शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत झालेल्या तनुश्री सुहास दिवाण या ठाण्यातील हरहुन्नरी नृत्यांगनेविषयी...
“जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात, ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे दि. ११ ते १४ ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे,” अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
बोलके डोळे, गोरा रंग, नखरेल अदा आणि पारंपारिक नऊवारी साडीतली नवरी सध्या सगळ्यांच्या मनात भरली आहे.
लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ठाणे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आ. संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे.
बालपणापासूनच आपली संस्कृती-परंपरेची नृत्याच्या जोडीने जोपासना करणारे तुषार सावंत यांच्या नृत्याविष्काराचा परिचय करुन देणारा हा लेख...
शिवसेनेच्या रण’रागिणी’च्या पतीची डान्सबारमधील अय्याशी सोशल मीडियात ‘व्हायरल’झाल्यानंतर ठाण्यातील बार संस्कृती चव्हाट्यावर आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे मनपाने उपवन परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘सूर संगीत’ नामक लेडीज बारवर कारवाई करून बार सील केला आहे.
‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट ज्यांच्या जीवनावर साकारला आहे, त्या शिवसेनेच्या दिवंगत आनंद दिघे यांनी ठाण्यातील बार संस्कृतीविरोधात शड्डू ठोकून कशाप्रकारे सेनेच्या रणरागिणी या शेट्टी कंपनीचे कंबरडे मोडतात, याचे वास्तव चित्रण ‘धर्मवीर’ चित्रपटात दाखवले आहे.
र्निबधमुक्त गुढीपाडव्याचे स्वागत करताना पूर्वीचा जोष, उत्साह, जल्लोष, चैतन्य, आनंद आणि एकूणच सकारत्मक वातावरण कल्याण डोंबिवलीत दिसून आले. मास्कमुक्त गुढीपाडवा असल्याने सगळ्य़ांच्या चेह:यावर आनंद ओसांडून वाहत होता. ९४ वर्षीय आजोबांनी दाणपट्टा चालवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांनी बर्ची नृत्य सादर करून डोंबिवलीकरांवर गारूड घातले.
गेली पाच ते सहा दशके नृत्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेल्या, नुकतेच ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. मंजिरी देव. त्यांच्या नृत्याविष्कारावर प्रकाश टाकणारा हा लेख...
भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील ‘कथ्थक’ शैलीचे आचार्य आणि लखनौच्या ‘कालका-बिंदादिन’ घराण्याचे प्रमुख प्रतिनिधी नृत्यशिरोमणी ‘पद्मविभूषण’ पं. बिरजू महाराज यांचे सोमवारी निधन झाले. कथ्थक नृत्याचा जगभर प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणार्या या कलाकाराचे योगदान आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा...
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे. आपतत्त्व सिद्धीसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर ऋचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विज या ऋचा म्हणतात. ‘आपोहिष्ठा मयोभुवः तान उर्जे दधातनः। महेरणाय चक्षसे योवः शिवतमो रसः तस्य भाजयतेह नः। उशतीरीव मातर: तस्मा अर गमाम वः। यक्ष क
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरूवात होत असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि संगीत नाटक अकादमी, डोंबिवली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम्’ या कार्यक्रमात डोंबिवलीतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना स्मिता बागुल-मोरे यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी ४० मिनिटांत विविध कला आपल्या कलाकारांसह सादर केल्या. स्मिता यांच्या नृत्य कारकिर्दीवर टाकलेला प्रकाश.
सचिन वाझेला पोलीस दलातून बरखास्त करण्याची तयारी सुरु अँटिलीया स्फोटक प्रकरणाच्या सखोल चौकशीतून रोज नवीन खुलासे होत आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या, संशयित गाडीचा शोध, संशयित कार मालक मनसुख हिरनची हत्या आणि या सर्वामागे हात असणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग यापूर्वीच उघडकीस आले आहे. आता याप्रकरणात एक बार डान्सर ही केस सोडवण्यातील महत्वाचा पुरावा ठरली आहे. महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथक याप्रकरणात तपस आकारत असताना सर्वप्रथम यामह
नृत्यकलेचा प्राण असलेल्या भावाभिव्यक्तीमध्ये पदन्यासासह मुद्रेचे अलौकिक प्रकटीकरण करणाऱ्या ‘नृत्यमुद्रा’ तेजश्री सावंत हिचा तेजस्वी प्रवास...
'पब्जी मोबाईल डेव्हलपर्स’तर्फे नुकतीच पुन्हा एकदा भारतात दणक्यात प्रवेश करण्याची घोषणा करण्यात आली. ज्यावेळी चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळीच हा व्हिडिओ गेम पुन्हा भारतात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा कंपनीतर्फे नुकताच देण्यात आला. 'पब्जी’ पुन्हा येत असला तरीही या कंपनीला भारताच्या अटीशर्तींशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे बंदीपूर्वी सुरू असलेल्या 'पब्जी’च्या स्वैराचाराला चापही लागला आहे.
भारतातील प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना पद्मश्री शोभा नायडू यांनी कुचिपुडी नृत्यशैलीत केवळ प्रावीण्य न मिळवता ही अभिजात कला पुढच्या पिढीला बहाल केली. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
‘कांधे का वो तिल’ रसिकांना मंत्रमुग्ध करत आहे
रिलायन्स जिओ बाईट डान्समध्ये हिस्सा खरेदीसाठी इच्छुक
दरवर्षी वनवासी बांधव मोठ्या जल्लोषात 'वनवासी गौरव दिवस' साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस ऑनलाइन पध्दतीने साजरा करण्यावर भर देण्यात आला. यासाठीच वनवासी समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑबओरिजिन सामाजिक संस्था व वनवासी विकास तर्फे प्रथम राष्ट्रीय ऑनलाईन नृत्य आणि फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ऑगस्ट २०२० दुपारी ३.०० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यक्षेत्रात देशात आघाडीचे नाव कमावणार्या अभिनेत्री आणि नर्तकी शोभना यांच्याविषयी...
आपल्या सौंदर्य, अभिनय, नृत्य, सामाजिक बांधीलकी व समंजस वागणूक या गुणांमुळे ओळखल्या जाणार्या, तसेच तमाशाप्रधान चित्रपटातल्या मादक, नखरेल कलावंतिणीपासून घरंदाज, कुलवंत ब्राह्मण कन्येपर्यंत अनेक भूमिकांमधून आपले सर्वस्व ओतणारी ही कलावती म्हणजे अभिनयसंपन्न जयश्री गडकर...
कथ्थकच्या मूळ मुद्रांना आणि हालचालींना हात न लावता, कुमुदिनी लाखिया यांनी त्यामध्ये अनेक बदल केले. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी केलेले हे बदल कथ्थक नर्तकांनी स्वीकारले. त्यांनी नुकतीच वयाची नव्वदी गाठली...त्यांच्याविषयी...
प्रसिद्ध पॉप सिंगर आणि ब्रेक डान्सर मायकल जॅक्सन याला कोरोना सारख्या महामारीची आधीच माहिती होती, असा दावा त्याच्या सुरक्षारक्षकाने दिली आहे. त्याला अशाप्रकारे महामारी एक दिवस सर्वांचा जीव घेईल याची जाणीव फार पूर्वीच झाली होती, अशी माहिती त्याच्या माजी सुरक्षारक्षकाने दिली आहे. याच कारणास्तव मायकल जॅक्सन वारंवार चेहऱ्यावर मास्क लावत होता. मात्र, सर्वजण त्याची खिल्ली उडवायचे परंतू तरीही त्याने मास्क परिधान करण्याची सवय सोडली नव्हती.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्याशिवाय ते अन्य विश्वस्तांशी राममंदिर बांधण्याबाबत चर्चा करू शकतात.
मुंबई विद्यापीठाचा १२ वा वसंत नाट्योत्सव उद्यापासून
कंगनाचा ‘पंगा’ थेट वरुण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’शी...
२५ व २६ जानेवारी रोजी महोत्सवाचे आयोजन
वरुण आणि श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’मध्ये दिसणार भारत-पाक सामना
पॅट्रिक व आजपर्यंत १४ वेळा अशा नृत्योत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले असून त्यात नामवंत भारतीय कलाकारांसोबतच जेनेव्हिएव ग्लेझ (मार्सेल, फ्रान्स) पॉलीन रेबेल (स्वीडन) ईसाबेल ना (पॅरिस, फ्रान्स) आणि साराह गासेर (झुरीच, स्विझर्लंड) या युरोपियन कलाकारांनी अनुक्रमे भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी या प्रकारचे सादरीकरण केले असून त्यास रसिक वर्गाची दाद देखील मिळाली आहे.
माधुरी दीक्षितने 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्षं पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. यात ती तिच्या लोकप्रिय 'एक दो तीन' या गाण्यावर थिरकताना दिसली.
५० व्या वर्षी,नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स(एनसीपीए) आपल्या कंटेंपररी डान्स सीजन २०१९च्या ९व्या आवृत्तीचे सादरीकरण करीत आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन ७ आणि ९ नोव्हेंबरला केले जाणार असून, त्यात मयूरी उपाध्या आणि माधुरी उपाध्या, सुमीत नागदेव, पूजा पंत आणि सायरस खंबाटासारख्या प्रसिध्द कलाकारांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे.