Enter your Email Address to subscribe to our newsletters
दिल्ली आणि गुरुग्राममधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. द्वारका एक्सप्रेसवेवरील बोगद्याचा ट्रायल २९ मेपासून सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बोगदा द्वारका आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडतो. बोगद्याची लांबी २.५ किलोमीटर आहे. ट्रायल दरम्यान दररोज ३ तास वाहतुकीस परवानगी दिली जाते. वेळ आहे दुपारी १२ ते ३.
Read More
मुंबई: ( Metro trial on DN Nagar to Mandalay route ) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ८ एप्रिलपासून मुंबई मेट्रो२बच्या 'मंडाळे ते डायमंड गार्डन' दरम्यानच्या ५.६ किमी लांबीच्या ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई)चा विद्युतप्रवाह सुरू करणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून त्याची फील्ड ट्रायल घेण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेच्या सभागृहात निवेदन दिले. यावेळी ते म्हणाले, सध्या लांब आणि म
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी सज्ज होतो आहे. भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली होती. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)ने दिली. सोमवार, दि.२४ जून रोजी या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
हुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो ३ ने मंगळवार, दि.७ रोजी दुपारी मुंबईत प्रवेश केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो 3) मार्गावर दादरपर्यंत ही ट्रेनची चाचणी घेण्यात आली. इतर सर्व बांधकामाधीन कॉरिडॉर उपनगरात आणि मुंबई महानगर प्रदेशात इतरत्र आहेत. मात्र, मेट्रो ३ हा एकमेव कॉरिडॉर आहे जो दक्षिण मुंबईतील प्रवाशांची पूर्तता करेल.
भारतीय रेल्वेमध्ये सामील होणारी 'वंदे साधारण' ट्रेनची सध्या चाचणी सुरु आहे. चेन्नईच्या कारखान्यातून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर मार्गे गुजरातमधील वडोदरा असा प्रवास या ट्रेनने पुर्ण केला आहे. दरम्यान, चाचणी पुर्ण करुन लवकरच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका २८ वर्षीय तरुणाची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवणे हे लैंगिक शोषण मानले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित डॉ. अविनाश बिनीवाले यांनी हिंदीमध्ये ‘बोमदिला’ ही कादंबरी लिहिली आणि ती देशभरातील वाचकांच्या पसंतीसही पडली. पुढे याच कादंबरीचा अनुवाद मराठीपासून ते अगदी कन्नड, गुजराती, भाषेतही झाला. नुकतीच गुवाहाटी येथे ‘बोडो साहित्य संमेलना’त ही कादंबरी बोडो भाषेतही प्रकाशित झाली. ‘बोमदिला’चे इंग्रजीवरून केलेले बंगाली भाषांतरही प्रकाशनमार्गावर आहे. त्यानिमित्ताने डॉ. अविनाश बिनीवाले यांच्याशी संवाद साधून उलगडलेला ’बोमदिला’ या कादंबरीच्या अनुवादाचा हा साहित्यिक प्रवास...
वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असतानाही आजही कर्करोग हा प्राणघातक आजार मानला जातो. मात्र, आता या आजाराला आयुष्यभराची आशा निर्माण झाली आहे.
सर्व आरोपींना पालघर सब जेलमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
हाथरससारख्या दुर्घटनेत सुरुवातीला जितका जोरदार निषेध केला जातो, तितक्याच हिरिरीने कालांतराने समोर येणार्या वस्तुस्थितीवर भाष्य केले जात नाही. न्यायालयीन सुनावण्या वेळखाऊ असल्या तरी त्यांचा अन्वयार्थ सत्याच्या अधिक जवळ जाणारा असतो.
‘COVAXIN’ पाठोपाठ झायडस कॅडीलाला देखील मानवी चाचणीसाठी परवानगी
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
अनेक मोठ्या प्रलंबित प्रकरणांचे निकाल सुरू आहेत. यामधील काही निकाल हे नक्कीच ऐतिहासिक म्हणता येतील असेच आहेत. त्याचप्रमाणे बरेचसे निकाल हे विवादीतसुद्धा आहेत. या सगळ्या विवादीत प्रकरणांवरती माध्यमांमधून आधीपासूनच खटला चालविण्यात येत होता किंवा वेगळ्या पद्धतीने त्या विषयीच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.
पीडितेच्या वकील दीपिका सिंह राजावत यांनी मात्र हे प्रकरण जम्मू बाहेर ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.