Enter your Email Address to subscribe to our newsletters
नशेच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला, त्यातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानाला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय नशामुक्त अभियान समिती स्थापन केली असून, यामार्फत मादक पदार्थविरोधी लढ्याला नवसंजीवनी मिळणार आहे.
Read More
संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ड्रग्जविरुद्ध मोठी लढाई लढणार असून नवी मुंबईपासून सुरु झालेली ही मोहिम इतरही ठिकाणी चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ड्रग्ज प्रकरणातील मोठी लढाई महाराष्ट्रात सुरू आहे. ललित पाटिलला कुणाचं समर्थन आहे हे सर्वांना माहिती आहे. ड्रग्जप्रकरणातील सहभागी पोलिसांना बडतर्फ करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटिल हा पोलिसांच्या ताब्यात आहे. यासंबंधी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. याच पार्श्वभुमीवर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“अमली पदार्थांचे सेवन ही अतिशय गंभीर समस्या आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच देशाच्या सीमा आणि तेथील सुरक्षा खिळखिळी करत आहे. मात्र, भारतास 2047 पर्यंत अमली पदार्थमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले आहे.