काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या ललित कला केंद्रात रामायण विडंबन नाट्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठे ही नेमकी शिक्षणाचे माहेरघर की विद्रोहाचे अड्डे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ प्रशासनाचा ‘हिंदूफोबिया’ असाच चव्हाट्यावर आला होता. तेव्हा, या घटनेतील तथ्य, तपास, कारवाई आणि न्यायाची प्रतीक्षा यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
“दर्शन सोळंकी आणि त्याच्या वर्गातील अरमान खत्री यांच्यात आधी वाद झाला होता. या वादाच्या नंतर दर्शनने आत्महत्या करत आपले जीवन संपविले होते. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण देऊन फुटीरतावाद्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. मुंबई ‘आयआयटी’मधील विद्यार्थी असलेल्या दर्शन सोळंकीच्या आत्महत्या प्रकरणावरून अद्याप गदारोळ सुरुच आहे. या प्रकरणी ’एसआयटी’च्यावतीने तपास सुरू झाला असून दर्शनची ‘सुसाईड नोट’ही हाती लागली आहे. त्यातच भाजप आमदार राम सातपुते आणि माजी
मूळचा गुजरात येथील दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी ‘आयआयटी’ वसतिगृहाच्या परिसरातच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने समाज ढवळून निघाला. काही संघटनांनी ठामपणे सांगितले की, दर्शन मागासवर्गीय होता म्हणून त्याच्याशी जातीभेद केला गेला. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. यावर ‘पवई आयआयटी’ने अंतर्गत अहवाल सादर केला. महाराष्ट्र सरकारने दर्शनच्या मृत्यूसंदर्भात विशेष तपास पथक नियुक्त केले. दर्शनच्या मृत्यूनंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि घटना यांचा मागोवा घेणारा हा लेख..
मुंबई आयआयटी विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी एफआयआर दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शनच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीकडून एफआयआर दाखल करताना आपल्यावर दबाव आणि छळ केला जात असल्याचा आरोप दर्शनच्या वडिलांनी केला आहे. यासंदर्भांत दर्शनच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती देखील केली आहे.
पवई आयआयतील दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने जिथे सातव्या मजल्यावरून ऊडी घेत आत्महत्या केली. त्या घटनास्थळाचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर निष्काळजीपणाबद्दल आयआयटी प्रशासनाला जबाबदार धरावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.
पवई 'आयआयटी'मधील विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी व्हावी. तसेच पुन्हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना पुन्हा घडू नयेत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पवई आयआयटीच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर शांतातपूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइं चे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, पवई विभागीय नेते बाळ गरुड, विनोद लिपचा