पाकिस्तानच्या संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान मौलाना फज्ल रेहमान या खासदाराने धक्कादायक विधान केले असून, त्याने बलुचिस्तानही बांगलादेशप्रमाणे स्वतंत्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही राजकीय वदंता नाही, तर पाकिस्तानच्या डळमळीत अस्तित्वाचे प्रतिबिंबच आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचा र्हास, दुसरीकडे कट्टरतावादाचा वाढता प्रभाव आणि तिसरीकडे स्वायत्ततेच्या लढ्याने पेटलेले प्रांत, या सर्व घटकांनी पाकिस्तानचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या ४४ टक्के एवढा मोठा भूभाग. मा
Read More
शाहबाज शरीफ यांच्या हातात विद्यमान संसदेची मुदत संपेपर्यंत एक वर्षांचा कालावधी जरुर आहे. पण, पाकिस्तानची डळमळीत झालेली अवस्था पाहता, शरीफ यांना आपला देश सावरता येईल की नाही, याची साशंकता आहेच