WHO

'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर

Read More

चोरीचा मामला...प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव ला तस्करीच्या प्रकरणी हातात सोन्याच्या बेड्या!

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. गेल्या काही दिवसांपासून तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवलं होतं. १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता. सोमवारी रात्री ती भारतात परतत असताना, अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. या तपासात तिच्या

Read More

आजकाल काही स्टार्समध्ये त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन्सच्या आकारावरून स्पर्धा असते – शर्मिला टागोर

हिंदी चित्रपटसृष्टीतील ८०-९० चे दशक आपल्या अभिनय आणि सौदर्याने गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर गेले ६५ वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ‘कश्मीर की कली’, ‘आराधना’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून शर्मिला टागोर यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, सध्याच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स आणि त्यांच्या वाढत्या मानधनाबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. नुकतीच शर्मिला टागोर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन लाइव्ह’ कार्यक्रमात बोलताना बॉलीवूड स्टार्सचे वाढते मानधन आणि व्हॅनिटी व्हॅन्सवर मत

Read More

“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, तेजस्विनी पंडित झाली मावशी

अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची ती निर्माती तर होतीच पण त्यात तिने उत्तम भूमिका देखील साकारली होती. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे. तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली असून तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Read More

"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं विधान

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांद प्राजक्ता निर्माती आणि स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शिकेच्या भूमिकेत समोर आल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ता आजवर सुत्रसंचालक, अभिनेत्री, निर्माती या रुपात तर दिसलीच पण आता लवकरच ती राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चिन्ह दिसत असून त्याबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे.

Read More

तुलसी परत येतेय! १५ वर्षांच्या ब्रेकनंतर स्मृती इराणी करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

‘क्युकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका म्हटलं की तुलसी अर्थात अभिनेत्री स्मृती इराणी यांचाच चेहरा समोर येतो. गेल्या काही काळापासून स्मृती इराणी राजकारणात सक्रीय आहेत. पण आता पुन्हा त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. अभिनेत्री रुपाली गांगुली यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अनुपमा' मालिकेत त्या महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच अनुपमा या मालिकेने १५ वर्षांचा लीप घेतला आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली. टाईम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, स्मृती इरानी या लीपनंतर मालिकेचा एक भाग असणार आहेत.

Read More

श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, तब्बल साडेतेरा लाखांचे दागिने जप्त

अभिनेत्री-दिग्दर्शिका श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी ३ जून २०२४ रोजी चोरी झाली होती. त्या चोरीचा छडा लालण्यात सातारा पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी १३ लाख ३१ हजारांचे १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कुणी नसल्याचे श्वेताने पोलिसांना सांगितले होते. त्या नुसार दाखल केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिला

Read More

“वैजू साकारताना माझं प्रेरणास्थान स्मिता पाटील होत्या" - ऋतुजा बागवे

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल.महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी पाहायला मिळते. शेतात राबून पैसे कमावून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या वैजुची ही गोष्ट आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी असून आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे हेच तिचे ध्येय आहे.

Read More

अभिमानास्पद! कान्समध्ये ३० वर्षांनी या भारतीय चित्रपटाने पटकावला 'ग्रॅंड प्रिक्स' पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी यंदाचा ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सव फारच आनंदी ठरला आहे. कान्समध्ये दोन दिवसांपूर्वी पायल कपाडिया दिग्दर्शित आणि मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं. यानंतर आता याच चित्रपटाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाने कान्समध्ये मानाचा समजला जाणारा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारवर भारतीय चित्रपटाने आपलं नाव कोरल्याने सध्या सर्व

Read More

अनासूया सेनगुप्ता ठरली Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय

७७ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ यंदा भारतासाठी खूप महत्वाचा आणि खास आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाला ४८ वर्षांनंतर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंगचा मान मिळाला. याशिवाय भारतीय कलाकार, सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. शिवाय भारतीय चित्रपट आणि कलाकारांना या महोत्सवात विविध श्रेणींमध्ये नामांकने देखील मिळाली होती. त्यातच अभिनेत्री अनासूया सेनगुप्ता ही ‘कान्स’ मध्ये पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कलाकार ठरली आहे.

Read More

लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय

२०११ साली झालेल्या अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात तब्बल १३ वर्षांनी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात लैलाच्या सावत्र वडिलांना काही दिवसांपूर्वी मुंबई सेशन कोर्टाने दोषी ठरवले होते. आता त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली असून लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक यांना दोषी ठरवत १३ वर्षांनी कोर्टाने त्यांना शुक्रवार २४ मे रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. लैलाच्या हत्येनंतर आता १३ वर्षांनी तिच्या कुटुंबा

Read More

श्रेया बुगडे ‘या’ व्यक्तीच्या जीवावर मित्रांना घरी जेवायला बोलावते, श्रेयानेच केला खुलासा

हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक

Read More