Enter your Email Address to subscribe to our newsletters
समाजात अलीकडील काळात मोबाईल फोन हाती आल्यानंतर जे वाट्टेल तसे अभिव्यक्त होण्याचे ‘फॅड’ आले आहे, ते पाहता यातील बहुतांश प्रमाणात समाजातील संवेदनशून्यताच दुर्देवाने अधिक प्रभावी ठरू पाहत आहे. जसे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे ( Insensitive ) आणि युट्यूबवरून नको असलेली व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसारित केली जातात, तसेच आजकाल रिल्सच्या माध्यमातून तर भयंकर प्रकार उजेडात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून केवळ समाजातील मानसिकता आणि संवेदनशून्यता प्रकर्षाने जाणवत असली, तरी त्यावर बंधने आणण्याची व्यवस्थाच कूचकामी असल्याचे देखी
Read More
सेवासुविधा तर सोडाच, पण राज्यात नव्याने लावण्यात आलेल्या कडक निर्बंधात पत्रकार वर्गाला उपनगरी रेल्वेने प्रवासाची मुभादेखील सरकारतर्फे देण्यात आलेली नाही. ‘लोकल’ प्रवासासाठी पत्रकारांना परवा मुंबईत आंदोलने करावी लागली, जे पत्रकार अनेकांना न्याय देण्यासाठी वेळेची परवा न करता, रात्रीचा दिवस करुन शासनावर प्रश्नांची सरबत्ती करत असतात, आज त्याच पत्रकारांना स्वत:च्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे, हे करुणास्पद म्हणावे लागेल.