Enter your Email Address to subscribe to our newsletters
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Read More
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करण्यात आली आहे. धारावीचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी कंपनीने शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात असलेल्या विदेशी कंपन्यांची मदत घेतली आहे. हा प्लॅन अंतिम टप्प्यात असून, तो पूर्ण होताच धारावीत एक सॅम्पल फ्लॅट उभारण्यात येणार असल्याची माहिती डीआरपीने दिली आहे.
देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वेगवान पूर्ततेसाठीच्या ‘गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान’अंतर्गत ४०व्या ‘प्रगती बैठकी’स संबोधित केले. यावेळी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच त्यांनी राज्यांना राज्यस्तरावरही ‘गतिशक्ती मास्टर प्लान’ तयार करण्याचे आवाहन केले.