Enter your Email Address to subscribe to our newsletters
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार महाराष्ट्रात आल्यापासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा न्यायालयीन कामकाजात गैरहजर असल्याचे मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. मुंबई पोलिसांनी या दाम्पत्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.
Read More
प्रशासनाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष; कामगार संघटनाही संतप्त
लॉकडाऊन घोषित झाल्यापासून गैरहजर असलेल्या ६०० कामगारांना बेस्ट प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कामगारांसाठी बेस्टने बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र कामगार मोठ्या प्रमाणात गैरहजर असल्याने बस चालविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने ६०० कामगारांना नोटिसा पाठविल्या असल्याची माहिती बेस्टने दिली.
भुसावळ बसस्थानकातून वरणगांव, बोदवड, फॅक्टरी, कठोरा, ओझरखेडा येथे बसेस नियोजनाप्रमाणे सुटत नसल्याने विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. यामुळे महामंडळाच्या नियोजनाबद्दल नाराजी व संताप व्यक्त होत आहे.