लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या स्मरणार्थ पुण्यात समारोह साजरे होत असतानाच, ज्या टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक मंडळे आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनदेखील कामाला लागले आहे. नुकतीच पोलीस आयुक्तांनी याबाबत विविध गणेशोत्सव मंडळांसमवेत मिरवणूक आणि अन्य बाबींवर सकारात्मक चर्चा करून उपाययोजनेबाबत आश्वस्त केले. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आता ठिकठिकाणी यंदा भारतीय संस्कृती संवर्धन आणि अन्य बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी
Read More
"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते.
‘जग बदल घालुनी घाव...’ असं म्हणणारे सुप्रसिद्ध समाजसुधारक, लेखक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वार्थाने भाषेच्या, राष्ट्राच्या सीमा ओलांडून अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांच्या ज्वलंत लेखणीमुळे परिवर्तनाचा वेगळा विचार मराठी मातीमध्ये पेरला गेला. काल त्यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या याच साहित्यविश्वाचा घेतलेला धांडोळा...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नात्यातील शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
मुंबईचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगाला देण्याचे जाहीर करताच उद्धव ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे जुनीच टेप वाजवली. ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव’ ही बोंबलून बोंबलून शिळी झालेली आरोळीच त्यांनी ठोकली. पण, यानिमित्ताने रडारड करणार्या मुंबईच्या मारेकर्यांनी या महानगरासाठी आजवर काय केले, हाच खरा प्रश्न!
शहरातील शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) सुट्टी द्या, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने ही मागणी केली. तसेच या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पुणे दौरा असल्याने अनेक रस्ते बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीता ही मागणी करण्यात आली.
ठाकरेसाहेब किती वर्ष घाणीत रहायचं?
भारतीय जनता पक्ष, विक्रोळीतर्फे नुकतीच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे आयोजन सुरेश गंगादयाल यादव, जिल्हा भाजप सचिव यांच्या माध्यमातून विक्रोळीतील सेवालय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मातंग समाजातील कर्तृत्वान बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला.
सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक’ हे ब्रीदवाक्य घेऊन समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशचे 19 वे समरसता साहित्य संमेलन दि. 2 आणि 3 जुलै रोजी नागपूरच्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरी’त संपन्न होत आहे. 19व्या साहित्य संमेलनाचा विषय आहे, ’साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’. संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्षीय भाषणाला फार मोठे महत्त्व आहे.
महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांचा चौथ्यांदा पत्रव्यवहार
‘सा. विवेक’ प्रकाशित ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची नुकतीच जन्मशताब्दी संपन्न झाली. सा.‘विवेक’ने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाची निर्मिती केली असून, त्याचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. हा प्रकाशन सोहळा ३.३० वाजता सा. ‘विवेक’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे फेसबुक पेज असलेल्या ‘महाएमटीबी’वरही आपल्याला ‘लाईव्ह’ पाहता य
"साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारचा सर्वोच्च भारतरत्न सन्मान प्रदान केला जावा यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे," आश्वासन आज भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी दिले. ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी पुण्यात आलेले असताना आमदार सुनिल कांबळे यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात बोलत होते. त्या वेळी ते पुढे म्हणाले ,"उद्यमशील व आत्मनिर्भर समाज स्वतःच्या व देशाच्या विकासाला गतिमान करतात. उद्यमशील व अरा
रवींद्र गोळे यांचा अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र साहित्य प्रकाशित करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याची टीका मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी पाचशे कोटींचा निधी द्या, अशी मागणी या महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा नेते अमित गोरखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. गोरखे यांनी सांगितले की, 'अनुसूचित जातीतील मातंग समाज व इतर पोट जातीतील समाजासाठी अस्तित्वात आलेले महामंडळ आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार मध्ये झालेल्या मोठया भ्रष्टाचारामुळे हे महामंडळ आजतागायत सावरू शकलेले नाही.'
ब्रिटिश भारतातून जात असताना ‘कोहिनूर’ हिरा आपल्यासोबत घेऊन गेले. पण, भारतमातेच्या कुशीत असे अनेक हिरे आणि नररत्न जन्मले, ज्यांनी आपल्या कार्याने, प्रतिभेने फक्त भारतवर्षच नाही, तर संपूर्ण जग तेजोमय केले. त्यापैकीच एक नररत्न म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे होय. जसे हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याचप्रमाणे अण्णा भाऊंच्या श्रीमंत व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत.
तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’, ‘गोवामुक्ती संग्राम’ या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचे आहे. माणूस जगला पाहिजे, माणुसकी जीवंत राहिली पाहिजे, न्याय जिंकला पाहिजे, अशी अण्णा भाऊंच्या विचारांची बैठक होती. त्या विचारांवर आज समाजात अनेक संस्
अण्णा भाऊ साठे म्हणजे एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजव्यवस्थेमुळे त्यांना कुठलीही ज्ञानाची, शिक्षणाची परंपरा लाभली नाही. त्यामुळे त्यांना घराण्याचा वैचारिक वारसा मिळालेला नव्हता. त्याकाळी ‘महार- मांगांची कला’ म्हणून ढोलकी- तुणतुणे आणि तमाशा हेच गणित होते.अण्णा भाऊंना जेमतेम वाचता येत होते. तरीही त्यांनी दलितांच्या,वंचितांच्या उद्धारासाठी आपली लेखणी झिजवली.
महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णा भाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली. अण्णा भाऊंचा जो हात डफावर पडला, त्याच हाताने त्यांनी पोवाडे लिहिले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने त्यांनी काळाच्या छातीवर मानवी शाश्वत मूल्यांच्या अस्मितेची लेणी कोरली. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली तळपती तलवार होती. कामगार चळवळीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. त्यांचे जीवन, त्
प्रत्येक मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुताही हवी असते. यात प्राणिमात्रांवरील दया, निसर्गावरील प्रेमही अंतर्भूत आहे. यासच ‘मानवतावाद’ असे म्हटले आहे. आपल्या भारत देशात अनेक राष्ट्र पुरूष होऊन गेले. एक सुसंस्कृत देश म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष आपण वेधून घेतले आहे. अनेक ऋषी, तत्त्वज्ञानी, महापुरुषांची परंपरा आपणास लाभली आहे.
शब्दाला आपलं करून शब्दाला वाचा देणारं, शब्दांची खाण, शब्दांची जाण आणि बहुजन समाजातील संघर्षाची धगधगती आग आणि वास्तव जीवनातील सत्य घटनांवर आधारित अण्णा भाऊ साठे यांनी कथा आणि कादंबऱ्यांचे लेखन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायकाला लढा मान्य होता रडगाणे नाही. त्यांच्या साहित्यातील नायक हा दलित, शोषित, वंचित समाजाचा आहे. परंतु, स्वाभिमानाने जगणारा आहे. इतरांसाठी लढणारा आहे, त्यागी समर्पित भावना ठेवून वेळ पडली तर जीवसुद्धा देणारा आहे.
अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांमधील स्त्रीनायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. मंगला, वैजयंता, आवडी, चित्रा, रत्ना, चंदना या नायिकांचे जगणे मनाला चटका लावून जाते. पण त्याचवेळी मनाला एक हुरूप देऊन जाते. स्त्री म्हणजे नाजूक, लाडे लाडे बोलणारी, पुरुषांवरच विसंबणारी परावलंबी सजीव, यासारख्या व्याख्येमधून अण्णा भाऊंच्या नायिका स्त्रीची सुटका करतात.
अण्णा भाऊंच्या साहित्याने, विचारांनी मला काय दिले? हा विचार करताना आयुष्यातल्या अनेक घटना आठवतात. त्या घटनांमधून मार्ग काढताना अण्णा भाऊंच्या साहित्यातली जाणिवा माझे प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या कादंबरीतले नायक कायमच माझे प्रेरणास्थान राहिले आहेत. प्रशासकीय सेवेत आणि वैयक्तिक आयुष्यातही समरस आणि नैतिक आयुष्याची संवेदनशील अनुभूती मला अण्णा भाऊंच्या विचारांनीच दिली.
अण्णा भाऊ साठे समाजाचे मानबिंदू आहेत. आज समाजाला उत्कर्षाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. अण्णा भाऊंच्या साहित्याने मला काय दिले? हा विचार केला तर उत्तर येते, माणसासाठी माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न्यायप्रिय राहण्याची सद्बुद्धी दिली, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची ताकद दिली.
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठे’ हा विशेषांक वाचकांसमोर आणताना विशेष आनंद होतो आहे.
साहित्यरत्न थोर लेखक अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राच्या पावनभूमीतील व मराठी वाङ्मय जगतातील जागतिक कीर्तीचा एक तेजस्वी ध्रुवतारा आहे. प्रतिभेच्या जोरावर ज्ञानार्जन करून साहित्यसेवेद्वारे देशप्रेम, देशसेवा, राष्ट्रप्रेम महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक काळापासून ते सद्यकालीन काळापर्यंत अचूक विश्लेषणात्मक मांडणी करणारे अण्णा भाऊ साठे एक अद्वितीय नाव होय. “वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा आहे,” असे १९५८च्या पहिल्या भारतीय दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणातून प्रतिपादन करणारे अण्णा भाऊ सामाजिक परिवर्तनातून सक्षम भार
साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन, सामाजिक, राजकीय जीवनांचे मूल्यमापन करणारे लिखाण अलीकडे होऊ लागलेले आहे. त्यांच्या सर्व साहित्यकृती अजोड आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्याच्या आधारे विशद केलेले तत्वज्ञान, रेखाटलेले विचार हे नुसतेच आधुनिक विचारांशी सुसंगत नव्हते, तर पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी मांडलेल्या विचारांच्या पुढच्या पल्ल्याकडे मार्गक्रमण करणारे होते. त्यामुळे अण्णा भाऊंचे विचार कालसापेक्ष न ठरता ते कालानुरूप जी स्थित्यंतरे घडून येतात, त्यावर प्रभाव पाडून त्यानुरू
पुरोगामी लोकांमध्ये वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असते. पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे असतात. भारतात ज्या महामानवांनी पुरोगामित्वाचा प्रचार व प्रसार केला, त्यांच्यापैकी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाने साहित्यातून, चळवळीतून, कलापथकातून समतावादी, सुधारणावादी, प्रयत्नवादी, प्रगतिवादी लेखन करून समाज प्रबोधन केले आहे. जागतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी जीवन जाणिवेसह सामाजिक संवेदनातून जी साहित्यनिर्मिती केल
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. अण्णा भाऊंच्या जीवनाकडे पाहिले तर अत्यंत कठीण अशा जीवनसंघर्षाला तोंड देत त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीने आपण अक्षरशः थक्क होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ते पुढे आले. सर्वसामान्य माणसाचे जगणे व त्यांचा संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय होता. एक विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि संवेदनशील कर्तृृत्व, माणूस म्हणून अण्णा भाऊ आणि त्यांचे साहित्य, विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देते. या अशा चरित्रनायक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे
अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ
समाजपुरुष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने त्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला वंदन. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आज अभिमानाने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. महामंडळावर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अण्णा भाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाचे हित साधायचे आहे. आज महामंडळापुढे अनेक प्रश्न असले तरी त्या प्रश्नांचा मागोवा घेताना मला एकटे वाटत नाही. कारण, महामंडळासोबत माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अपूर्व नेतृत्व आहे. तसेच मंत्री चंद्रकांतदादा पा
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय, समूहाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे.हे अण्णा भाऊ जाणतात आणि माणसाला केंद्रस्थानी लिखाण करताना त्यांच्या आसपासच्या सर्व गोष्टींची नोंद अण्णा भाऊ घेताना दिसतात. त्यामुळे विविध समाजगटाचे दर्शन अण्णा भाऊंच्या
‘अण्णा भाऊ कम्युनिस्टच होते,’ असे सांगण्याची धडपड काही लोक सातत्याने करताना दिसतात. हेतू हाच की, अण्णा भाऊंना मानणाऱ्या समाजाने ‘लाल बावटा’ हातात घ्यावा. अण्णा खरोखरच कम्युनिस्ट होते का? त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर उत्तर स्पष्ट येते की, ते कम्युनिस्टांसोबत होते, पण ते कधीही कम्युनिस्ट नव्हते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माझे अल्प विचार मांडत असताना मला अतिशय आनंद होत आहे. अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी, समीक्षकांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांना अण्णा भाऊ जसे दिसले तसे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रही वीरांची, थोरांची भूमी... छत्रपती शिवाजी महाराज ते अगदी अण्णा भाऊ साठेंपर्यंत ही नामावली आहे. अण्णा भाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांची महती अगदी परेदशात गायली. त्याचा संदर्भ...
स्त्रीने कसे असावे, याचे ठोकताळे समाजमनाने त्याचे त्यानेच ठरवलेले असतात. ते कालही ठरवलेले होते, आजही आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या 'ठरवलेपणाला' या 'साचेबद्धपणा'ला अलगद नाकारत स्वत:चे अवकाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणार्या आहेत. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ‘फकिरा’ (१९५९) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी समजली जाते. अण्णा भाऊ लिखीत ही ‘मास्टरपीस’ कादंबरी ऐतिहासिक व समकालीन आहे. ‘फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राष्ट्र, राजकीय व्यवस्था, प्रेम अशा उच्च मूल्यांची पेरणी करताना दिसतात. याचबरोबर दिनदलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा, राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांचीही शिकवण देतात म्हणून ‘फकिरा’ सामाजिक व राष्ट्रीय उदात्त व उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला दस्तऐवज ठरतो.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ या दोघांना एकमेकांपासून वगळताच येणार नाही. अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचा, वैचारिकतेचा आणि साहित्यिकतेचाही कस शाहिरी रूपात पुढे आला, तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये.
अण्णा भाऊंच्या शाहिरीचा बाज हा माणसाच्या जगण्याचा विषय होता. हा विषय धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणिवेचा जागर होता. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावापुढे आपोआपच ‘लोकशाहीर’ ही उपाधी लागली.
पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. त्या लोकमान्य टिळक स्मृतिश
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली
मातंग समाजातली पहिली महिला उपजिल्हाधिकारी, प्रशासकीय कारकिर्दीमध्ये समाजभानत्यातही स्त्री सक्षमीकरणाची आस असलेल्या शुभांगी साठे.