Enter your Email Address to subscribe to our newsletters
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या जनसेवेच्या २५व्या वर्षात प्रवेश केल्याची घोषणा केली. त्यांनी २००१ साली याच दिवशी प्रथमच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्र त्यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले – “२००१ मध्ये आजच्याच दिवशी मी प्रथमच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. देशवासियांच्या अखंड आशीर्वादामुळे मी सरकारच्या प्रमुखपदावर सेवा देत २५व्या वर्षात प्रवेश करत आहे.”
Read More
वस्ती उपक्रम 'स्त्री शक्तीचा जागर' या कार्यक्रमाचे आयोजन दि.५ ऑक्टोबर, रविवार रोजी धन्वंतरी सभागृह, पटवर्धन बाग येथे करण्यात आले होते. श्रीसुक्त पठण आणि त्यानंतर भोंडला असा कार्यक्रम संपन्न झाला. संभाजी नगरातल्या सर्व वस्तींमधून अत्यंत उत्साहात पारंपरिक वेशभूषा परिधान करून सत्तर भगिनी एकत्र जमल्या होत्या. वरुणराजाने कार्यक्रमाच्या आधी जणू सडा शिंपला.शंखनादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रीसुक्ताची आवर्तनं आणि त्या नंतर भोंडल्याची पारंपरिक गाणी आणि त्याला जोड नवीन गाण्याची असा भोंडला रंगत गेला. सर्वांनी उत
(Tata Power Renewable Energy Limited) टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असणाऱ्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने ८० मेगावॅट क्षमतेच्या फर्म आणि डिस्पेचेबल रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पासाठी टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनसोबत वीज खरेदी करार (पीपीए) केला आहे. हा प्रकल्प सर्वात जास्त मागणी काळात विश्वसनीय ऊर्जा वितरण सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रिड स्थिरता मजबूत करण्यासाठी प्रगत सौर, पवन आणि बॅटरी स्टोरेज सिस्टम एकत्रित करेल, अशी माहिती टाटा पॉवरने दिली आहे.
संपूर्ण जगातील कोणत्याही प्रकारच्या सत्ता संपुष्टात आणून एक निरंकुश समाजव्यवस्थेची निर्मिती करण्याचा साम्यवादाचा जुनाच मानस. कोणत्याही समाजाची, व्यक्तीवरील मानसिक, सांस्कृतिक वा वैचारिक सत्ता सांस्कृतिक साम्यवादास मान्य नाही. त्यानिमित्ताने ‘सांस्कृतिक साम्यवाद’ या संकल्पनेचा ऊहापोह करणारा लेख...
शाश्वततेच्या दिशेने पुढाकार घेत टाटा पॉवरने नुकतेच मुंबईतील देवनार येथे दत्ताराम पाटील, जी गार्डन येथे वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, टाटा पॉवरचे प्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम, स्थानिक स्वयंसेवी संस्था, तसेच कर्मचारी व स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.
भारताची अर्थव्यवस्था आज जगातील सर्वांत वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते आणि तिच्या या प्रवासाला दिशा देणारा खरा पाया म्हणजे कृषिक्षेत्र. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय कृषिक्षेत्राने तब्बल ३.७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ही वाढ जगातील सर्वोच्च ठरली असून, गेल्या वर्षीची १.५ टक्क्यांची वाढ लक्षात घेतली, तर या झेपेचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. या यशामागे केंद्र सरकारच्या दूरदृष्टीचा आणि शेतकर्यांच्या अथक परिश्रमांचा सुंदर मिलाफ आहे. ‘प्रधानम
अमेरिकेच्या ‘एच-१बी’ व्हिसा शुल्कवाढीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांत भारताला नव्या संधी शोधाव्या लागणार आहेत. ब्रेन ड्रेनमुळे दशकानुदशके गमावलेली प्रतिभा आता देशातच राहील. ‘एआय’, सेमिकंडटर आणि बहुराष्ट्रीय गुंतवणूक भारताला जागतिक आर्थिक शक्ती बनवण्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.
आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत मंजूर आजीवली–भातान २२ केव्ही वीज वाहिनी विलगीकरणाचे काम मंगळवार,दि.१६ सप्टेंबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे आजीवली–भातान परिसरातील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित होणार आहे.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासदौर्यादरम्यान गुजरात, मुंद्रा येथील अदानी अपारंपरिक ऊर्जा उत्पादननिर्मिती कारखाना, अदानी औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प आणि मुंद्रा बंदर येथे भेट देण्याचा योग आला. त्यानिमित्ताने या अभ्यासदौर्यादरम्यानच्या महत्त्वाच्या नोंदींचा लेखस्वरूपात घेतलेला हा आढावा...
टाटा पॉवरने भारतातील सर्वात मोठी ४-चाकी ईव्ही उत्पादक कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या सहकार्याने, TATA.ev मेगाचार्जर उपक्रमांतर्गत मुंबईतील पहिल्या मोठ्या प्रमाणात सुविधा देणाऱ्या ईव्ही चार्जिंग हबचे उद्घाटन केले आहे.
अमेरिकेनंतर रशिया आणि चीन या प्रस्थापित महासत्ता. पण, भारताने आता या जागतिक सत्तास्पर्धेत प्रवेश केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे सारे जग आशेने पाहत आहे. रशिया-युक्रेन युद्धबंदी असो की, अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा सामना करायचा असो, त्यावर तोडगा भारतच काढू शकेल, अशी जागतिक समुदायाची भावना असून त्याचेच प्रतिबिंब ‘एससीओ’च्या बैठकीत उमटलेले दिसले.
भारत लवकरच स्वतःचे शक्तिशाली जेट इंजिन तयार करणार असल्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. घोषणा ही आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा आहे. आजवर लढाऊ विमानांच्या इंजिनांसाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या भारताने, आता स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील ८ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणारी भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवर, शहरातील मंडळांना विश्वसनीय, अखंडित तात्पुरते वीज कनेक्शन प्रदान करून शहराच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या गणेशोत्सव उत्सवांना पाठिंबा देण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे.
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच देशामध्ये ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ सुरु करण्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. देशाच्या लोकसंख्येत जाणीवपूर्वक बदल एका नियोजित कटाच्या माध्यमातून घडवून आणले जात असून, ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही यावेळी मोदी यांनी दिला.
भारताच्या इतिहासात रणांगण गाजवणारे पुरुष कमी अधिक प्रमाणात गौरवले गेले आहेत. पण, या इतिहासात ज्यांनी अविचल धैर्य, राजकीय मुत्सद्देगिरी आणि अप्रतिम नेतृत्वगुण दाखवले, त्या अनेक वीरांगना मात्र विस्मरणात गेल्या आहेत! या अज्ञात स्त्री शक्तीच्या योगदानावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ग्रंथ काही महिन्यांपूर्वी वाचकांसमोर आला आहे ‘अपराजिता.’ पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या अत्यंत चांगल्या प्रतिसादानंतर याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे.
नियोजनबद्ध षडयंत्र करून देशाच्या लोकसंख्येची रचना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. घुसखोरांना वसवून देशातील वनवासी, माता आणि भगिनींनी लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून घुसखोरांविरोधात ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ सुरू करून घुसखोरांना देशाबाहेर काढले जाईल; अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात देशास संबोधित करताना केले आहे.
कुठल्याही देशातील सर्वांगीण प्रगतीचा मार्ग हा ऊर्जा क्षेत्रातील क्षमतेवरही अवलंबून असतो. कारण, शेती असो उद्योगधंदे अथवा रहिवाशी विभाग, सुरळीत वीजपुरवठ्याअभावी सगळ्याच व्यवस्था कोलमडतात. त्यामुळे भारताला सर्वार्थाने ऊर्जासक्षम करण्यासाठी आणि त्यातही अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवण्यासाठी गेल्या दशकात आपल्या देशात मोठी क्रांती घडून आली. तेव्हा, या विकासपर्वात अनन्यसाधारण योगदान देणार्या ऊर्जा क्षेत्रातील क्रांतिकारी प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख...
सत्तेशी समझौता न करता संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी मला दिली आणि मी जीवनभर ती पाळली. ते अंडरवल्डच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढणारे गृहमंत्री होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० ऑगस्ट रोजी केले.
देशाच्या राजधानीतील ‘पॉवर कॉरिडोर्स’मध्ये सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे. तो म्हणजे असं अचानक नेमकं काय झालं? आणि अर्थातच त्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. त्याचे उत्तर अतिशय मोजयाच व्यक्तींकडे आहे आणि त्या व्यक्तींकडून त्याचा खुलासा लगेचच होईल; अशी शयता कमीच. त्यामुळे दिल्लीच्या ‘पॉवर कॉरिडोर्स’मध्ये आणखी एका अशा घटनेची भर पडली आहे, ज्याचे उत्तरही कदाचित काही वर्षांनीच मिळू शकेल. मात्र, तोपर्यंत सावल्यांचा अर्थात थिअरीजचा खेळ सुरूच राहणार आहे. अर्थात, ‘पॉवर कॉरिडोर्स’ला अशा घटनांची सवय असतेच.
भारतने ऊर्जेच्या क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ५० टक्के विद्युत उत्पादन क्षमता आता जीवाश्म इंधनरहित, म्हणजेच हरित आणि अणुऊर्जेसारख्या स्वच्छ स्रोतांमधून येते. सध्या देशाची एकूण विद्युत उत्पादन क्षमता ४८४.८ गिगावॅट इतकी असून, त्यातील २३४ गिगावॅट स्वच्छ ऊर्जेमधून आणि ८.७ गिगावॅट अणुऊर्जेमधून येते. उर्वरित २४२ गिगावॅट ही पारंपरिक, ऊर्जा प्रकल्पांमधून मिळते. हे यश म्हणजे केवळ आकड्यांचे गणित नाही, तर ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय जबाबदारी आणि भावी पिढ्यांच्या हक्कांना महत्त्व द
महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवार दि. ९ रोजी एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात ८६००० कर्मचारी संपात सहभागी होतील असा कर्मचारी संघटनांचा अंदाज आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
अमेरिकेतील राजकारण प्रदीर्घ काळ डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स या दोन पक्षांभोवती केंद्रित राहिले. मात्र, सध्या एलॉन मस्कसारख्या दिग्गज उद्योगपतीने नवीन पक्षस्थापनेची शक्यता निर्माण करून अमेरिकेत खळबळ माजवलेली दिसते. त्यानिमित्ताने अमेरिकेतील द्विपक्षीय राजकीय रचनेची मर्यादा, तिसर्या पक्षांची दुर्दशा आणि नव्या शक्तीच्या उदयाची शक्यता यांचे हे आकलन...
जून 2025 मध्ये भारताच्या औद्योगिक विकासाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून, उत्पादन व्यवस्थापक निर्देशांक 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचत 61.0 वर स्थिरावला. ‘मेक इन इंडिया’, ‘पीएलआय योजना’ आणि सरकारच्या पायाभूत सुविधा धोरणांनी उद्योगविश्वात उत्साह निर्माण केला असून, जागतिक मागणी विशेषतः आशिया-आफ्रिका बाजारात वाढलेली निर्यात आणि देशांतर्गत आर्थिक स्थैर्य यामुळे, भारत आता उत्पादन क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयाने मुस्लिम महिलेला तलाकच्या खुला पद्धतीद्वारे पतीच्या सहमतीविना तलाक करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने(आयएमपीएलबी) या निर्णयाविरुद्ध चर्चेसाठी मंगळवार, दि. १ जुलै रोजी बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘महावितरण’ने गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षांत कंपनीच्या वीजखरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. ‘महावितरण’ने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल. यानिमित्ताने ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
नुकतेच तामिळनाडूमधील विराट हिंदूशक्तीचे दर्शन सर्वस्वी सुखावणारे आणि सत्ताधारी द्रमुक सरकारला हादरवणारे ठरले. ज्या तामिळनाडूतील सत्ताधार्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यूृ-मलेरियाशी करण्याचा नीचपणा दाखवला, आज त्याच तामिळनाडूमध्ये चार लाख मुरुगन भक्तांनी केलेला हिंदू एकतेचा शंखनाद भविष्यातील राजकीय परिवर्तनाकडे अंगुलीनिर्देश करणारा ठरावा.
राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प २.०अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंब
AI चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी संपूर्ण जगाला इशारा दिला की एआयमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होऊ शकते. 'सुरक्षित' असणाऱ्या नोकऱ्या या एआय मुळे संपुष्टात येऊ शकतात. असे विधान जेफ्री हिंटन यांनी केले आहे.
टाटा, बेस्ट, अदानीसोबत आता महावितरणलही हवीय मुंबईत वीज वितरणाची परवानगी
चीन हा आशियामध्ये सैन्य कारवाईची तयारी करत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला आहे. त्याचबरोबर आशियामधील अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण खर्चात वाढ करून संरक्षण सिद्धता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शनिवार, दि. 31 मे रोजी सिंगापूरमधील शांग्री-ला परिषदेत संबोधित करताना अमेरिकेच्या इंडो-प्रशांत भूभागातील अमेरिकेच्या बदलत्या रणनीतीविषयी बोलताना चीनच्या वाढत्या धोक्याविषयी भाष्य केले.
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
(Veteran Nuclear Scientist M. R. Srinivasan passes away at 95) प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी २० मे रोजी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी तामिळनाडूतील उदगमंडलम येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारताने एक असा शास्त्रज्ञ गमावला आहे ज्यांनी देशाला अणुऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न साकार केले.
पाकच्या दहशतवादी मनसुब्यांविरोधात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारताच्या संरक्षण सिद्धतेने जगालाही भुरळ घातली. विशेषत्वाने या ऑपरेशनमधील सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असलेल्या ‘ब्रह्मोस’या यशस्वी लक्ष्यभेदाने कित्येक देशांनी भारताकडे या क्षेपणास्त्र खरेदीची मागणी नोंदवली आहे. तसेच ‘उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोर’चा झपाट्याने होणारा विकासदेखील, भारताची संरक्षण सज्जता अधोरेखित करतो. त्यानिमित्ताने भारताचे ब्रह्मास्त्र ठरलेल्या ‘ब्रह्मोस’चा शस्त्रवेध घेणारा हा लेख...
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे ऊर्जा अर्थात शक्तीचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनीही कायमच रणांगण नुसते गाजवलेच नाही, तर आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूलाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. काळ कितीही बदलला तरी भारतातील स्त्रियांमधील पराक्रम आजही आहे तसाच आहे. आज भारतीय सैन्यदलात मोठ्या संघर्षाने स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रत्येक स्त्री हाच पराक्रमाचा वारसा जपताना दिसते. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे त्या स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. स्त्रियांच्या संघर्षाचा
राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व
भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी आणि मुंबईत सुमारे ८ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरला १०० मेगावॅट क्षमतेचे 'बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम' उभारण्यासाठी 'महाराष्ट्र वीज नियामक आयोग'कडून मान्यता मिळाली आहे.
( Mumbai Essential services will continue even if the entire city loses power ) भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी आणि मुंबईत सुमारे ८ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरला १०० मेगावॅट क्षमतेचे 'बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम' उभारण्यासाठी 'महाराष्ट्र वीज नियामक आयोग'कडून मान्यता मिळाली आहे.
( comprehensive policy benefit local industries from thermal power plants Chief Minister Devendra Fadnavis ) औष्णिक केंद्रांमधील राखेबाबत २०१६ मध्ये शासनाने केलेल्या धोरणात २० टक्के राख स्थानिक उद्योगासाठी आणि ८० टक्के लिलाव असे प्रमाण होते. परंतु केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १०० % लिलाव करावा लागतो. या राखेचा स्थानिक उद्योगांना लाभ होऊन उद्योग वाढीसाठी शासन सर्वंकष धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
( Overhead power lines in Vasai-Virar Municipal Corporation area will be buried in the next 2 years ) वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात टप्प्या-टप्प्याने भुमिगत करणार अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना दिली. वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड वायरर्स असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे ओव्हरहेड वायरर्सवर पडून वीज वारंवार खंडित होते. यामुळे या वायरर्
‘महावितरण’च्या आर्थिक सुस्थितीसाठी राज्यसरकार प्रयत्नशील: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने ८२ दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित करून आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. यावेळी महिलादिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे, जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असणार आहे. या खासप्रसंगी, मी माझे ’एक्स’ आणि ’इंस्टाग्राम’सारखे सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पं
इको वेव्ह पॉवर या ऑनशोअर वेव्ह एनर्जी टेक्नॉलॉजी कंपनीने भारत पेट्रोलियमसोबत भारताच्या अंदाजे ४०,००० मेगावॅटच्या समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
टाटा पॉवरने त्यांच्या ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये युनिट ५ (५०० मेगावॅट) यशस्वीरित्या पुन्हा सुरु केले आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी केबल व्हॉल्टमध्ये आग लागली होती, ऑर्डर प्लेसमेंटच्या चार महिन्यांनंतर विक्रमी वेळेत रिस्टोरेशन करून टाटा पॉवरने ग्रीडला वीज पुरवठा सुरु केला आहे.
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात करार
भारतातील महाकुंभची चर्चा अगदी सातासमुद्रापारही असून, विदेशी पर्यटकही जगातील या सर्वांत भव्यदिव्य अशा अध्यात्मिक पर्वणीत सहभागी झाले आहेत. शिवाय एक भगवेधारी राज्यशकट कसा हाकणार, असा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून खोचक प्रश्न उपस्थित करणार्यांनीही महाकुंभतील ( Maha Kumbha ) प्रशासकीय व्यवस्था, तत्परता पाहून तोंडात बोटे घातली आहेत.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा सोलापूर प्रकल्प आता वीज निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील.
टाटा पॉवरच्या पुणे जिल्ह्यातील शिरवाटा येथील १,८०० मेगावॅटचा बहुप्रतिक्षित जलविद्युत साठवण प्रकल्प आणि रायगड जिल्ह्यातील भिवपुरी येथे आणखी १,००० मेगावॅटच्या पीएसपीला आवश्यक मंजुरी आणि मंजुरी मिळाल्याचे टाटा पॉवरच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे येत्या महिनाभरातच या प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरु होईल. हा प्रकल्प येत्या ४४ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा ( Solar Energy ) विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी दिले.
अदानी समुहावरचे आरोप आता षड्यंत्राकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. भारताने कायमच विकसनशील राहावे या विचाराने आजही हुकूमशाही प्रवृत्तीच्या संस्था, देश आणि माणसे कार्यरत आहेत. त्यांच्या दिमतीला आपले इमान कवडीमोल भावात विकलेले काही आपले राजकारणी आहेतच. अदानींवरील आरोपांचा आणि त्यामागील इकोसिस्टमचा हा आढावा...