Enter your Email Address to subscribe to our newsletters
अॉस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही नावाजलेल्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड (बॉल टेम्परिंग) केल्याचा प्रकार दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यादरम्यान समोर आला आणि त्यानंतर क्रिकेटविश्वातील वातावरण ढवळून निघाले. हे दोन्ही खेळाडू आपली शिक्षा भोगून आजमितीस ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात खेळत असले, तरी पूर्वीप्रमाणे या खेळाडूंचा नावलौकिक काही राहिलेला नाही.
Read More
विदेशी खेळपट्ट्यांवर चेंडू अधिक वेगाने उसळी घेतो. चेंडू जूना होत नाही तोपर्यंत धावांचा डोंगर उभा राहातो. परिणामी विरोधी संघाला धक्का देण्यासाठी अशा कुटनितीचा वापर वेळोवेळी अशा खेळपट्ट्यांवर खेळताना विविध संघांनी केला आहे.
आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो ढसाढसा रडला. ही चूक मी कधीही विसरू शकणार नाही, मी पूर्णपणे उध्वस्थ झालो आहे, मला माफ करा, असे उद्गार त्याने यावेळी काढले.
स्मिथबरोबर संघाचा उपकर्णधार असलेल्या डेविड वॉर्नर याने देखील आपल्या उपकर्णधार पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतला असून यापुढे टीम पेन हा संघाच नेतृत्व करणार आहे,