“मार्क्सचा मार्ग हा हिंसेचा आणि अशाश्वत आहे, तर बुद्धाचा मार्ग करुणेचा, लोकशाहीवादी आणि शाश्वत आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व माजी राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. ते ८ ऑगस्ट रोजी वनिता समाज सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे झालेल्या “बुद्ध की कार्ल मार्क्स” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथावरील कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
Read More
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २९ जून रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकपार पडली.