Anti-Terrorist Structure

चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

(Tirupati Balaji Mandir) आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे.

Read More

'म्हाडा'तर्फे राज्यभरात वृक्षारोपण मोहीम ; वन महोत्सव सप्ताहानिमित्त अनोखा उपक्रम

जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत म्हाडाने गृहप्रकल्प परिसरात दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या झाडांची निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 'म्हाडा'चे उपाध्यक्ष

Read More

'येरे येरे पैसा ३' मधील 'उडत गेला सोन्या' हे 'जेन झी' ब्रेकअप साँग प्रदर्शित!

'येरे येरे पैसा ३' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'उडत गेला सोन्या' प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता 'येरे येरे पैसा ३' मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना या

Read More

कन्हैयालाल यांच्या हत्येची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटावर बंदी आणा; मुस्लिम संघटनेची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read More

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.

Read More

भोपाळच्या नवाबांच्या खाजगी मालमत्तेच्या वादावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सैफ अली खानची १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार?

भोपाळचे तत्कालीन शासक नवाब मोहम्मद हमीदुल्ला खान यांच्या खाजगी मालमत्तेसंबंधी सुरू असलेल्या वारसा हक्काच्या वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला निकालावर पुन्हा कार्यवाही सुरू करण्याचे आणि एका वर्षात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. साजिदा सुलतान यांच्या वारसा हक्कावर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या आदेशामुळे शर्मिला टागोर, सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान यांच्या वारसा हक्कावर गदा आल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

Read More

भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या पुढाकाराने जात प्रमाणपत्र शिबिर - एकाच दिवशी ६२१ प्रमाणपत्रांचे वितरण

भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या (भटके विमुक्त विकास परिषदेशी संलग्न संस्था) पुढाकाराने आणि महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज तिरोडा तहसील कार्यालयात मांग-गारुडी समाजासाठी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकाच दिवशी ६२१ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते.या कार्यक्रमात गोंदिया जिल्हाधिकारी मा. प्रजित नायर, डॄज मा. पूजा गायकवाड, तहसीलदार मा. ठाकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस

Read More

मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही! - मंत्री आशिष शेलार यांनी खा. निशिकांत दुबेंना सुनावले

मराठी माणसाच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला महाराष्ट्र सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा देताना भाजप आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानाचा विधानसभेत समाचार घेतला. “हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, महाराष्ट्राबाहेर पडा, तुम्हाला आपटून मारू,” असे आक्षेपार्ह वक्तव्य दुबे यांनी केल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शेलार यांनी “मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही आणि महाराष्ट्र तर मुळीच नाही,”

Read More

कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन संपन्न...

गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार भोईर यांचे आभार मानले आहेत.

Read More