Enter your Email Address to subscribe to our newsletters
(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे.
Read More
(Marathi MNS Morcha in Mira bhayandar) मराठीच्या मुद्द्द्यावरुन मीरा-भाईंदर परिसरात मनसे, उबाठा गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण चिघळले होते. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मात्र पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. सध्या बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरेंनीदेखील आपले मौन सोडले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीबाबत संकेत दिले आहेत.
( Raj Thackeray )काही दिवसांपूर्वी मालाड पूर्व येथे घडलेल्या मनसे कार्यकर्त्याच्या मुलाच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. कट मारल्याने सुरू झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून आकाश माइन याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मालाड येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी कंपनीचा दहिसर टोलनाका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.मनसेचे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री (टोल आणि सार्वजनिक प्रकल्प) दादा भुसे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी लेखी निवेदन देखील मंत्री भुसे यांना दिले आहे.
राजकरणात एक सत्य आहे की तुम्ही जर सत्तेमध्ये नसाल तर आमदार होऊन काही फायदा नाही. म्हणून "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.
मनसे आणि रासपच्या ( MNS Jankar Mahayuti ) महायुतीत येण्याने कोणताही पेच निर्माण होणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ सुद्धा नाशिकच्या जागेवर इच्छुक आहेत. या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बदलापूर : 'पराभव मान्य करता येत नसेल तर काय बोलणार', असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप लगावला. ते बदलापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं असा टोलाही राज ठाकरेंनी भाजपला लगावला. तसेच भाजप नेते आशिष शेलारांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. मोदींमुळेच यांचं अस्तित्व असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंनी यावेळी दिली. विरोधकांच्या चांगल्या गोष्टी कधीतरी मान्य केल्या पाहिजेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
फडणवीस - शिंदे - राज : दीपावलीच्या औचित्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दादर येथील शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या या दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थितांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेला दीपावली पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
मागील सहा वर्षांपासून काम सुरू असणारा सध्याचा मुंबईतील पूल म्हणजे ‘हँकॉक पूल’ माझगाव आणि डोंगरी परिसराला जोडणारा हँकॉक पूल बांधून 18 महिन्यांत पूर्ण होणे, अपेक्षित होते. मात्र, सहा वर्षांनंतरही या पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. या चारपदरी असणार्या हँकॉक पुलाच्या दोन मार्गिका न्यायालयाच्या आदेशामुळे दि. 1 ऑगस्ट रोजी खुल्या करण्यात आल्या आहेत. परंतु, या पुलाचे आतापर्यंत झालेले काम हेदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले. रंगशारदा सभागृहातील मेळावा संपल्यानंतर राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात राणेंची भेट घेतली. त्यांचा तब्बेतीची विचारपूस केली.
'छेडेंगे तो छोडेंगे नही' असा ईशारा देणाऱ्या 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी हा मुंब्र्यातून फरार झाल्याचे उघड झाले आहे. मुंब्रा पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमावाला रस्त्यावर एकत्र आणून भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम पदाधिका:यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त क रीत भावनिक पोस्ट केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात मनसेतील मुस्लीम पदाधिका:यांची बैठक घेऊन काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यात येणार आहे.
राज्य शासनाने रिक्षा भाड्यांमध्ये वाढ केली आहे. या भाडेवाढीनंतर रिक्षांच्या मीटरमध्ये (मीटर कॅलिब्रेशन) सुधारणा करावी लागणार आहे. ही सुधारणा करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ज्या एजन्सी नियुक्त केल्या आहेत. त्या एजन्सींकडून रिक्षाचालकांची लूटमार सुरू आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आधीच सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्याप्रमाणे मनसेनेही व्यूहरचना आखली आहे. त्याच दृष्टीने राज ठाकरे यांनी आज वाशी कोर्टात उपस्थित राहण्याचे निमित्त करून नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यासाठी वाशी परिसरात सर्वत्र मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमले होते. कोर्टाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांची बैठकही घेतली.
आगरी-कोळी बोलीला राजाश्रय मिळावा यासाठी तिचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी पुढाकार घेत असलेल्या ठाण्यातील साहित्यिकांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या होत्या. महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आगरी भवन व वारकरी संप्रदायाकडून वारकरी भवन उभाणार असल्याची घोषणा ही राजू पाटील यांनी केली होती.
राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी वीजबिल आंदोलन दरवाढीसाठी ठिय्या मांडला असताना आता राज ठाकरे यांनीही सरकारविरोधात दोन हात केले आहेत. सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून सर्वसामान्य जनतेला बिले भरू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास ठाण्यात विजबिलाविरोधात आंदोलन करताना मनसे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.
१४व्या वर्धापनदिनी मनसेने जाहीर केली शॅडो कॅबिनेट
आम्ही म्हणू तेच खरे आणि केंद्र सरकार जे सांगते ते खोटे, या मानसिक विकृतीने बरबटलेल्या सीएएविरोधी आंदोलन-आंदोलक व बेताल शहाण्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होतीच. तेच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच त्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने केल्याचे स्पष्ट होते.
मनसेच्या नेतेपदी निवड होताच मांडला शिक्षण ठराव
पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांना हकलवून लावणार असाल तर केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि प्रस्तावित एनआरसी विधेयकाला पूर्णपणे पाठींबा देऊ, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशेनातून केली.
राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता कदाचित मनसैनिक त्याचे उत्तर गर्वाने देऊ शकतील की, आम्हाला लोकांना घराबाहेर काढून मारण्याचा तरी कार्यक्रम मिळाला. अर्थात, हा कार्यक्रमही किती दिवस टिकेल, याची शाश्वती मनसैनिक देणार नाहीत. ‘टोल’च्या वेळी पोळून निघाल्याने ‘ट्रोल’च्या वेळी ते थोडे अधिक सावध असतील.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडत असताना मनसेच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जरी भाजप सरकारविरोधात ओरड कधीचीच सुरू केली असली तरी या लोकसभा निवडणूकीबाबतची भूमिका मात्र अजूनपर्यंत गुलदस्त्यात ठेवली आहे. निवडणूक लढवायची की नुसताच दुसऱ्यांचा प्रचार करायचा हेही न समजल्याने नेहमीप्रमाणे मनसैनिक बुचकळ्यात पडले आहेत.
मनसे कार्यकत्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड
पुण्यात मल्टिप्लेक्समध्ये अधिक दरात खाद्य पदार्थ विकत असल्याने नाराज होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करत पीव्हीआर येथील व्यवस्थापकाला मारहाण केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयाचे पॉपकॉर्न २५० रुपयाला का ? , असा प्रश्न खुद्द न्यायालयाने उपस्थित केल्यानंतर मनसैनिकांनी आज थेट सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआरमध्ये धडक दिली.
कोकणात उभारण्यात येणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगतिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे.