Enter your Email Address to subscribe to our newsletters
Lord Shri Ram रामायण ही केवळ कथा नाही, तर तो एक प्रवाह आहे. प्रवाह संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा. प्रभू रामचंद्रांची चरणरज भारतभूमीत पडली असली, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने आणि मर्यादेच्या मोहिनीने सारे विश्वच मोहित झाले. रामनवमीनिमित्ताने ‘रामायणाचा जागतिक वारसा’ या विशेषांकात आपण रामकथेच्या या जागतिक प्रवासाचा वेध घेत आहोत. विशेषांकात रामकथेच्या प्रवासाची सुरुवात भारताच्या सीमेलगतच्या देशांपासून केली असून, मग हा प्रवास आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतींपर्यंत कसा पोहोचला, त्याचे विविध लेखा
Read More
Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.
Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण
देशभरात आज प्रभू श्रीरामाच्या जन्माचा (Ramnavami ) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. भक्तिभावाने लोकं प्रभू रामाची पूजा करत आहेत. अशात आजच्या या शुभदिनी गायिका मुग्धा वैशंपायन हिने स्वत: संगीतबद्ध केलेले (Ramnavami) गाणे प्रदर्शित झाले आहे. 'राघवा रघुनंदना' असे हे गाणे असून खास रामनवमीच्या दिनानिमित्त तिने रामभक्तांना ते अर्पित केले आहे.
“राम जन्मला गं सखी.. राम जन्मला”, आज याच गाण्यांच्या ओळी प्रत्येकाच्या मुखी आहेत. रामनवमीच्या (Ramnavami) निमित्ताने लाखो भाविक अयोध्यात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. याच गर्दीत एक चेहरा अधोरेखित झाला. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांनी अयोध्येत रामलललाचे दर्शन घेत प्रभू रामाच्या चरणी गायनसेवा (Ramnavami) देखील केली.
(Jitendra Awhad on Ramnavami) रामनवमी, हनुमान जन्मोत्सवाबाबत जितेंद्र आव्हाड यांचे संतापजनक वक्तव्य!
रामायणातील सर्वांत मोठा धडा म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात धार्मिकतेचे सर्वोच्च महत्त्व आहे. धार्मिकता ही जीवनाला प्रज्वलित करणारी आध्यात्मिक ठिणगी आहे. धार्मिकतेचा विकास ही माणसातील सुप्त देवत्व जागृत करण्याची प्रक्रिया आहे. परमात्म्याचा तेजस्वी अवतार प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनातून नीतिमत्तेच्या मार्गावर कसे चालायचे हे दाखवून दिले आहे. नुकत्याच देशभर उत्साहात साजर्या झालेल्या रामनवमीनिमित्त आदर्शांचा आदर्श असलेल्या प्रभू श्रीरामांचे हे विचारदर्शन...
श्रीराम नवमीच्या वेळी देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचाराची भारताच्या निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगामार्फत चौकशी करण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयु) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आयोजित श्रीराम नवमी कार्यक्रमावर डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी हल्ला केल्याचा आरोप अभाविपतर्फे सोमवारी करण्यात आला. यामध्ये अभाविपचे कार्यकर्ते जखमी झाले.
पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात रामनवमी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत. हावडा येथील रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे पश्चिम बंगाल पोलिसांचे कारस्थान असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
"श्रीराम हेच आमचे पूर्वज असून त्यांच्याशिवाय आमचे अस्तित्व काहीच नाही" अशा शब्दांत भावना व्यक्त करत वाराणसीत मुस्लिम महिलांनी रामनवमी उत्सव साजरा करत सामाजिक, धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले
१४ वर्षांच्या वनवासामध्ये रामाच्या सहवासात येणारे बहुतेक सगळेच सहकारी आजच्या आधुनिक जगातले बहुजन समाजाशी वारसा सांगणारे पूर्वज आहेत. राम प्रत्येक क्षणी या समाजघटकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच ‘आम्ही रामवंशी आहोत’ असे महाराष्ट्रातील रामोशी समाज म्हणतो; नव्हे देशातील कोणताही समाज हा आपली समाजमिथक कथा सांगताना रामाशी नाते जोडल्याशिवाय पुढे जात नाही. त्यामुळेच सर्व समाजघटकांचा प्रतिनिधी असलेले राम संविधानाच्या पुस्तकातही चित्रीत झाले. किन्नर एक शोषित वंचित घटक. स्त्री-पुरूष, किन्नर, पशू-पक्षी, वृक्षवेलींना आप
रामायण म्हटले की, आम्हासमोर उभ्या राहतात, त्या अनेक दिव्योत्तम, तपस्वी, त्यागी व कर्तव्यनिष्ठ अशा अनेकविध आदर्श प्रतिमा. रामायण (राम + अयन) म्हणजेच श्रीरामाचा समुज्ज्वल जीवनप्रवास. एक प्रकारची ही कर्तव्यनिष्ठेची वाटचाल. पवित्र उद्देशाचे हे मार्गगमन म्हणजेच अयन (यात्रा)! याच अयनात श्रीरामांना अनेक प्रवासी भेटतात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण प्रतिमा आम्हा सर्वांसमोर उभी राहते, ती म्हणजे बालब्रह्मचारी व शक्तिशाली अशा वीर हनुमंताची! वानर जातीमध्ये जन्मलेले, पण विविध ज्ञानसंपदेने व शौर्यगुणांनी परिपूर्ण असलेले हनुम
“स्वतः भारतभ्रमण करा, समस्या जाणून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे कार्य हीच राष्ट्रसेवा आहे, समाजसेवा आहे आणि हीच श्रीरामाची, समर्थांची सेवा आहे,” असे विचार समर्थ रामदासस्वामींचे अभ्यासक, ज्येष्ठ व्याख्याते सुहास जावडेकर यांनी खास श्रीराम नवमीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
दि. १३ सप्टेंबर २००७. संपुआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘अॅफिडेव्हिट’ सादर केले. त्याचा आशय होता - श्रीराम ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, ऐतिहासिक नाही. श्रीराम कधीच जन्मले नव्हते. अर्वाचीन काळात जन्म झाल्याचा पुरावा म्हणजे जन्मदाखला. या दाखल्यावर काय काय माहिती येते? तर - बाळाचे नाव, आई-वडिलांचे नाव, कुळाचे नाव, पूर्वजांचे नाव, जन्म तिथी, जन्म वेळ, जन्म वर्ष आणि जन्मस्थान. श्रीरामांच्या बाबतीत यातील कोणती माहिती ‘वाल्मिकी रामायणा’तून उपलब्ध होते. आज रामनवमीनिमित्त त्यावर टाकलेला हा प्रकाश...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ब्रम्ह रथोत्सव रद्द
अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात भाविकांना पुढील महिन्यात रामनवमी उत्सवाच्या काळात आरतीत सहभागी होता येणार आहे. आजवरच्या इतिहासात अशा प्रकारची व्यवस्था प्रथमच करण्यात येत आहे. रामनवमीच्या आधी रामलल्लाची मूर्ती सध्याच्या तात्पुरत्या मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या दुसर्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. सध्या जिथे रामलल्ला विराजमान आहे, तिथे फक्त मंदिराचे मुख्य पुजारी महंत सतेंद्र दास आणि त्यांचे चार अनुयायी दररोज आरती व पूर्जा करतात.