Enter your Email Address to subscribe to our newsletters
(Tirupati Balaji Mandir) आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे.
Read More
मध्य प्रदेश राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमांवर आक्षेप घेणाऱ्या तीन याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.पदोन्नतीत आरक्षण देण्यास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा आणि न्या. विनय सराफ यांच्या खंडपीठाने तात्पुरती स्थगिती सोमवार दि.८ जुलै रोजी दिली गेली.
(Vadodara Bridge Collapse) गुजरातच्या वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवर असलेल्या गंभीरा पूलाचा काही भाग कोसळल्याने अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी ९ जुलैला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातादरम्यान वाहनांची वर्दळ सुरू असल्याने काही वाहनं थेट महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून इतर काही नागरिक नदीपात्रात अडकल्याची शक्यता असल्यामुळे शोधमोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
'बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.
मीरा-भाईंदर येथील पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मीरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवार, ९ जुलै रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत म्हाडाने गृहप्रकल्प परिसरात दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या झाडांची निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 'म्हाडा'चे उपाध्यक्ष
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे घर काही मिळाले नाही. आगामी मुंबई पालिकेची निवडणूक आणि मराठी मतांच्या बेगमीसाठी काल उद्धव ठाकरेंचा गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या आंदोलनात फुकाचा कळवळाच दिसून आला.
लेखक, विचारवंत आणि व्याख्याते दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यात 3 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्याने एक सेन्सॉर बोर्ड तयार करण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे बंधन अथवा सेन्सॉर सिनेमावर सरकार तर्फे घालणार नाही, असे स्पष्ट करतानाच लवकरच राज्याचे चित्रपट धोरण तयार करण्यात येत असून त्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग राहील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी...
नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १५ ऑगस्टपूर्वी लंडनहून महाराष्ट्रात परत आणली जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सोमवारी दि.७ जुलै रोजी विधानसभेत आणि विधान परिषदेत दिली.
प्रवाशांच्या सोयीसाठी चार्टिंगच्या वेळेत बदल चार तासांऐवजी आठ तास आधी होणार तयार प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील बीपी मरीन इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्या बॅचला सुरुवात वाढवण पोर्ट इकोसिस्टममधील आणि सध्या नवी मुंबईतील बीपी मरीन इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाढवन पोर्ट स्किलिंग प्रोग्रामद्वारे आयोजित केलेल्या जीपी रेटिंग कोर्सच्या पहिल्या बॅचचे जेएनपीएने आयोजन केले.
भारत आपल्या देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढवण्यासाठी मोठी पावले उचलत आहे. भारताकडे असलेल्या विशाल किनारपट्टीवर आठ मेगा क्लस्टर विकसित करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यापैकी पाच पूर्णपणे नवीन ग्रीनफील्ड प्रकल्प असतील, तर तीन प्रकल्पांमध्ये विद्यमान सुविधांचा विस्तार समाविष्ट असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार, ८ जुलै रोजी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याने आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनी वरील 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या लोकप्रिय रिॲलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. सहा कीर्तन रत्नांमधून ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले विजेते ठरले आहेत. ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे, ह.भ.प.हर्षद महाराज भागवत, ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, ह.भ.प.कल्याणी महाराज मोरे, ह.भ.प.लक्ष्मण महाराज लटपटे हे सहा जण अंतिम फेरीत पोहचले होते. या सगळ्यांच्या सुमधुर कीर्तन सादरीकरणाने सोहळ्याला चांगलीच रंगत आणली.
'येरे येरे पैसा ३' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'उडत गेला सोन्या' प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता 'येरे येरे पैसा ३' मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना या
जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये सध्या वातावरण तापले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेले मनसे नेते अविनाश जाधव यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी सुटका करताच त्यांनी मोर्चात सहभाग घेतला.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा आणि प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने दि. १८ जून, २०२५ ते १७ जुलै, २०२५ या कालावधीत राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी दोन्ही सभागृहात केले.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीसंदर्भात मतदारांची बूथ निहाय्य किंवा विशेष गहन पुनरावृत्ती(Special Intensive Revision) करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिक मंगळवार, दि. ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आठ विरोधी पक्षांनी दाखल केली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळात मंगळवारी देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असताना, विरोधी पक्षांनी मात्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून सभागृहाचे वातावरण बिघडवले आणि थेट सरन्यायाधीशांना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याची मागणी करत नवा वाद निर्माण केला.
नवीन इमारतीमध्ये सर्व आवश्यक व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध, व्यावसायिकांची पुनर्वसन प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये राबविणार, छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे पुनर्वसन छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन हे महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये करण्यात येत आहे. या नवीन इमारतीमध्ये आवश्यक तसेच अत्याधुनिक अशा सर्व सेवा-सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाटणा शहरात नामवंत उद्योजक गोपाळ खेमका यांची भरदिवसा हत्या होते आणि त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी, नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्हेगारीची राजधानी बनवल्याची टीका करतात. यात शंका नाही की, खेमका यांची हत्या ही गंभीर घटना आहे आणि त्यामुळे बिहारमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतो आहे. पण टीका करताना काँग्रेसने केलेली संधीसाधू टीका, हे त्यांच्या दुटप्पी राजकारणाचं जिवंत उदाहरण ठरावे. राहुल गांधी जेव्हा गुन्हेगारीबाबत भाष्य करतात, तेव्हा त्यांनी आधी महाराष्ट्रातील मविआच्या सत्ताकाळातील दांभिक मौनाक
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली दि.७ जुलै रोजी सहकार पॅनेलने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईदरम्यान काँग्रेस पक्षाला “राष्ट्राच्या शत्रूंची बाजू घेणारा” असे विधान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केले होते. या विधानावरून काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गोस्वामी यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवार,दि. ७ जुलै रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषशैंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर पार पडली
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे एका वारकऱ्याचे प्राण वाचले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवा मिळाल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले आहेत.
भोपाळचे तत्कालीन शासक नवाब मोहम्मद हमीदुल्ला खान यांच्या खाजगी मालमत्तेसंबंधी सुरू असलेल्या वारसा हक्काच्या वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला निकालावर पुन्हा कार्यवाही सुरू करण्याचे आणि एका वर्षात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. साजिदा सुलतान यांच्या वारसा हक्कावर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या आदेशामुळे शर्मिला टागोर, सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान यांच्या वारसा हक्कावर गदा आल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.
महाराष्ट्राचे सुपुत्र, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल मंगळवार, दि. ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा दुपारी २ वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या (भटके विमुक्त विकास परिषदेशी संलग्न संस्था) पुढाकाराने आणि महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज तिरोडा तहसील कार्यालयात मांग-गारुडी समाजासाठी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकाच दिवशी ६२१ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते.या कार्यक्रमात गोंदिया जिल्हाधिकारी मा. प्रजित नायर, डॄज मा. पूजा गायकवाड, तहसीलदार मा. ठाकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस
संकल्प संस्था गेली १२ वर्षापासून चेंबूर गोवंडी शिवाजी नगर मानखुर्द या एम/पूर्व विभागात वस्ती विकास प्रकल्प अंतर्गत शैक्षणिक आरोग्य,महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन या विषयावर कार्य करीत आहे. मानखुर्द येथे संकल्प संस्था आणि आरिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एम/पूर्व मानखुर्द विभागातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यासाठी संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे तसेच आरीन फाऊंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ यांनी पुढाकार घेतला.
देशाच्या अनेक भागात रविवारी मोहरम ताजिया मिरवणुकीदरम्यान हिंसाचार आणि तणावाच्या घटना घडल्या. विशेषतः मध्य प्रदेशातील उज्जैन आणि बिहारमधील कटिहार येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, जेथे मिरवणुकीत सहभागी असलेल्या काहींनी मंदिरांना लक्ष्य केले, पोलिसांवर हल्ला केला आणि परिसरात तणाव निर्माण केला.
मराठी माणसाच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला महाराष्ट्र सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा देताना भाजप आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानाचा विधानसभेत समाचार घेतला. “हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, महाराष्ट्राबाहेर पडा, तुम्हाला आपटून मारू,” असे आक्षेपार्ह वक्तव्य दुबे यांनी केल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शेलार यांनी “मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही आणि महाराष्ट्र तर मुळीच नाही,”
गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार भोईर यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
२०१९ साली प. बंगालच्या संदेशखालीमध्ये उसळलेल्या दंगलीत तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. हे हत्या प्रकरण साहजिकच ममता सरकारच्या विस्मृतीत गेले असले, तरी आता ‘सीबीआय’कडून या प्रकरणी कठोर तपास केला जाईल. दुसरीकडे कर्नाटकात घडलेली देवतांच्या मूर्तींची विटंबना असेल किंवा बिहारमध्ये मोहरम निवडणुकीवेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, यासांरख्या घटनांमध्ये सहभागी हिंदूविरोधी समाजघटकांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे.
(Ashadhi Ekadashi 2025) पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह केली.
मुंबईतील ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘रंग मल्हार’ या कलाप्रदर्शनात महिला चित्रकारांच्या सशक्त अभिव्यक्तीची प्रचिती येते. त्यांच्या या अभिव्यक्तीमध्ये पावसाची, निसर्गाची वेगवेगळी रूपं उमटलेली बघायला मिळतात. अशा या कुंचल्यातून साकारलेल्या अभिव्यक्तीचा घेतलेला हा आढावा...
(Vitthal Rukmini Mandir Wadala) वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सपत्नीक विठुरायाची पूजा केली, त्यावेळी ते बोलत होते.
(Kangana Ranaut) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी - हिंदी भाषेवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर ५ जुलै मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरुन आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या मातेचा सिंहासनी राजा, छत्रपती शिवाजी महाराज आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर साजरे होणार आहेत, पण यावेळी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून! महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित आणि सिद्धार्थ बोडके अभिनित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याने अक्षरशः मनात वादळ उठवलं आहे.
कलाशिक्षक यश महाजन यांनी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय आराध्य दैवत विठू माऊलींच्या विषयी श्रद्धा भावना व्यक्त करण्यासाठी मोर पिसावर विठू माऊलींची चित्र रेखाटले.
'अनेक विनाषकारी शक्ती गजवा-ए-हिंद करू पाहतायत, परंतु आपले स्वप्न एकच आहे, भगवा-ए-हिंद!', अशी कडक घोषणा बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी रविवारी केली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर 'सनातन महाकुंभ'चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्रासाठी आवाज उठवल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रातील कोळीवाड्यांमधील मच्छीमारांच्या मुलांसाठी आता सागरी खेळांच्या प्रशिक्षणाची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. 'यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' आणि राज्य सरकारच्या 'मत्स्यव्यवसाय व बंदर विभागा'च्या संयुक्त विद्यमाने, सर्फिंग, सेलिंग आणि स्टँड-अप पॅडल बोर्डिंगसारख्या खेळांचे प्रशिक्षण अत्यंत माफक दरात दिले जाणार आहे.
कराडमध्ये एका लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेली गुप्त भेट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीने राजकीय मनोमिलनाचे संकेत मिळत असून, जयंत पाटील यांच्या नव्या राजकीय वाटचालीची कुजबुज सुरू झाली आहे.
विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प पूर्ण
पंढरपूर म्हणजे मराठी जनमानसाचे प्रेमपीठ! विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन मागची अनेक शतके वारीची ही प्रथा अखंडितपणे, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. मानवी जीवन समृद्ध करणार्या याच विठ्ठलयात्रेचा घेतलेला हा आढावा.
बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी... श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीची वाट कुणाला गवसू शकते, कोण या वाटेवर येऊ शकते, त्याचे रहस्यच श्री हरीपाठातील या अभंगांमध्ये सांगितले आहे. प्रत्येक जीवाचे सुकृत उदयाला आल्याखेरीज त्याची ओढ श्री पंढरीकडे होणे नाही. श्री पंढरीनाथ हा सर्व संतांचा ध्येय विषय आहे. हा ध्येय विषय कसा आणि काय, हे सर्वांनीच समजून, जाणून घ्यायला हवे.
मुंबईत हिंदू एक होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तेचे भुकेले असलेले स्वार्थी राजकारणी मराठी, हिंदी, गुजराती वगैरे आपसात प्रांतवादातून द्वेष पसरवत असतील का? दुसरीकडे मुंबईपासून काही अंतरावर साकिब नाचण याने भारतात धर्मांध दहशतवाद्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, म्हणून पडघा बोरिवलीला ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केले होते. त्यासाठी त्याची प्रेरणा ‘इसिस’ होते. ‘इसिस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया.’ ‘इसिस’ने हजारो, लाखो लोकांना मारले असेल, हजारो महिलांवर अत्याचार केले. या साकिब न