Enter your Email Address to subscribe to our newsletters
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेच्या पुढाकारातून गेली १० वर्षे निर्मलवारी अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्ये एकूण ३६०० फिरती शौचालये वापरली जात असून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये अतिरिक्त दोन हजार शौचालये बसवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या स्थानिक प्रशासनाने २६ हजार सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. निर्मलवारी उपक्रमामुळे पालखी मार्गावरील गावांमधील घाणीत ८० टक्के घट झाली आहे.
Read More
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २५ येथील शौचालयाचे आणि ओम गगनगिरी सोसायटीच्या सभामंडपाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आणि भाजपा सहसंयोजिका निशा परुळेकर यांच्या पुढाकाराने नुकतेच पार पडले.
राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे
( Womens groups to manage womens toilets on highways minister aditi tatkare ) चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक 25 किमी अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय, महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार, द
मुंबईसह राज्यातील महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावी यासह हॉटेल्स ढाबे आणि पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ स्वच्छतागृहांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी बुधवार, १९ मार्च रोजी विधानपरिषदेत केली.
मुंबई मेट्रो ७ आणि २ए मार्गावरील ३० मेट्रो स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता पुरवण्याकरीता मुंबई मेट्रोने ‘टॉयलेट सेवा ॲप’ यांच्या सहकार्याने स्वच्छ्ता उपक्रम राबवला आहे. या ॲपद्वारे मेट्रो स्टेशनवरील ‘टॉयलेट’ची संपूर्ण माहिती प्रवाशांना तात्काळ मिळू शकणार आहे.
मध्य रेल्वेने लोकल रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने भायखळा स्थानकावर फलाट क्रमांक १ वर नवीन स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. भायखळा येथील अमृत स्थानक योजनेअंतर्गत पुरुषांसाठी ०२ शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी ०१ प्रसाधनगृह आणि महिलांसाठी १ , महिला दिव्यांगांसाठी ०१ स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत अजून २ शौचालयाचा स्थानकावर समावेश आहे. एक फलाट नंबर १ वर (कल्याण च्या शेवटी) आणि दुसरा प्लेटफॉर्म नंबर ४ वर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या शेवटी) जवळपास तयार आहेत. हे स्वछतागृहे देखील
केरळमधील कोल्लममध्ये आशिक बद्रुद्दीन नावाच्या स्थानिक काँग्रेस युवा नेत्याला बाथरूममध्ये कॅमेरा ठेवून महिलांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलांनी काँग्रेसचा युवा नेता आशिक बद्रुद्दीन यांच्याविरोधात थिनमला येथे शौचालय ऑपरेटर म्हणून काम करत असताना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पुण्याच्या मंचर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्यामुळे धर्मरक्षक दल संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेकडून या कृतीच्या प्रत्युत्तरात एका सार्वजनिक शौचालयाचे नामकरण 'औरंग्या शौचालय' असे करण्यात आले आहे. तसेच स्टेटस ठेवलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.. दरम्यान यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान संघटनेकडून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत असून, त्याद्वारे लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयाचे आज पालकमंत्री लोढा यांनी लोकार्पण केले. वांद्रे पश्चिम येथील नित्यानंद नगर येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रसंगी भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आज ‘निर्मल वारी’ या प्रकल्पाला कोरोनातील दोन वर्षे सोडली, तर सात वर्षे सलग गती मिळाली आहे. वारकर्यांना सुद्धा आता याविषयी फारसे काही सांगावे लागत नाही. याबाबत समाज प्रबोधन घडून त्यांच्या कडून चांगले सहकार्य मिळते आहे. या ‘निर्मल वारी’साठी समन्वयाची, व्यवस्थापनाची भूमिका आजही ‘सेवा सहयोग’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिरीरीने करत आहे. त्यानिमित्ताने ‘निर्मल वारी’चा संकल्पनेपासून ते यशस्वितेपर्यंतच्या प्रवासाचा, अनुभवांना शब्दबद्ध करणारा हा लेख...
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील नागरिकांसाठी जगताप डेअरी चौक परिसरात पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेल्या स्मार्ट टॉयलेटचे (स्मार्ट सार्वजनिक शौचालय) सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पीपीपी तत्वावर (सार्वजनिक खासगी भागीदारी) हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विक्रोळीतील पँथरनगरमध्ये वयोवृद्धांचे हाल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. ६००० नागरीसंख्या असणाऱ्या या परिसरात केवळ १६ शौचालयांची सोय असून ही शौचालये पूर्णपणे जाम झाली असल्याची आणि या शौचालयांमध्ये पाण्याची सोय नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. परिसरात विजेची सोय नसल्यामुळे अनेकदा येथील वयोवृद्ध नागरिक पाय घसरून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
कोटींच्या अर्थसंकल्पाची तरतूद असणारी मुंबई महानगरपालिका शौचालयांच्या वापरासाठी नागरिकांना लुटत आहे, अशी धक्कादायक बाब घाटकोपरमधील नालंदा नगर परिसरातील नागरिकांनी उघड केली आहे. परिसरातील शौचालयांमध्ये स्वच्छता नसून शौचालयांच्या वापरासाठी घरागिणीस प्रत्येकाकडून १००० ते १३०० रुपये घेतो, अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे. तसेच परिसरातील गटारे साफ केली जात नसल्यामुळे सर्व पाणी आमच्या दारात येते, अशीही व्यथा नागरिकांनी मांडली आहे.
”मागील अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. पण, मुंबई महापालिकेने कधीच आमच्याकडे लक्ष दिले नाही,“ अशी खंत कांजुरमार्ग येथील प्रभाग क्र. 111 मधील नागरिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. तसेच, अनेकदा पालिकेकडे अर्ज करूनही त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याचे येथील स्थानिकांनी स्पष्ट केले.
दिंडोशीमधील प्रभाग क्र.40 मध्ये मुंबई महापालिकेकडून स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. मात्र, पालिकेकडून त्याची स्वच्छता राखण्यात येत नसून, प्रचंड दुर्गंधीमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली. तसेच, लोकप्रतिनिधींकडूनही यासंबंधी कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
लाखभर लोकसंख्येसाठी एकच सार्वजनिक शौचालय
बोरिवलीच्या गोराईमधील मुलांसाठी खेळायला मुंबई महापालिकेचे एकमेव मैदान प्रभाग क्र. ९ येथे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी राजे उर्फ ‘पेप्सी ग्राऊंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या या मैदानाची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्यामुळे आम्हाला येथे खेळायला मिळत नाही, अशी तक्रार येथील तरुणांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली.
दिंडोशीमधील प्रभाग क्र.४० मध्ये मुंबई महापालिकेकडून स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. मात्र, पालिकेकडून त्याची स्वच्छता राखण्यात येत नसून, प्रचंड दुर्गंधीमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली.
विक्रोळीतील पँथरनगरमध्ये वयोवृद्धांचे हाल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. सहा हजार नागरीसंख्या असणार्या या परिसरात केवळ १६ शौचालयांची सोय असून ही शौचालयांच्या दुरवस्था आणि या शौचालयांमध्ये पाण्याची सोय नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. परिसरात विजेची सोय नसल्यामुळे अनेकदा येथील वयोवृद्ध नागरिक पाय घसरून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या समस्येबाबत येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी
मुंबईमध्ये असंख्य झोपडपट्टी आणि चाळी असून त्या ठिकाणी शौचालयांची उभारणी करणे हि पालिका आणि म्हाडाची जबाबदारी आहे. परंतु या साठी कोट्यवधींचा निधी शिल्लक असतानाही सार्वजनिक शौचालयांची कामे हि रखडलीच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
काही समाज आणि आरोग्य शास्त्रज्ञांच्या मते, २०० वर्षांपासून माणसाचे जीवनमान २० वर्षांने वाढले आहे. कारण, माणसाने शौचव्यवस्थेसंदर्भात काळजी घेण्यास सुरुवात केली.
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा व हाजी ताहिर उर्दू हायस्कूल या शाळेत शौचालय नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व ‘नाना पालकर स्मृती समिती’चे व्यवस्थापक कृष्णा महाडिक यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबईमधील उद्योगपती सुमनताई रमेश तुलसियानी यांची भेट घेतली.
गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. मग गरज कोणतीही असो. ती पूर्ण करण्यासाठी अनेकदा डोकॅलिटी वापरली जाते आणि अशा कामाचे कौतुक तर होतेच. आशिष राऊत या नगरी तरुणाने आपल्या कल्पकतेतून ‘फोल्डिंग टॉयलेट’ ही अनोखी संकल्पना मांडली, त्याच्याविषयी...
स्वत:पासून सुरू झालेल्या विकासाची प्रेरणा ही समाजोत्थानाचा केंद्रबिंदू झाली. नि:स्वार्थी प्रेरणेने केलेले काम समाजात पोचपावती मिळवतेच आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रुझच्या 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम. वस्तीतील लोकांसाठी शौचालय असावे, या जिद्दीने वस्तीतील काही युवक एकत्र आले आणि त्यांच्या समाजकार्याची महती वैश्विक स्तरावर पोहोचली.
गुगलवर बेस्ट टॉयलेट पेपर सर्च केल्यावर दिसतो पाकिस्तानचा झेंडा
शहरातील राम मंदिर चौकात महिलांंसाठी नवीन शौचालय बांधण्यात यावे तसेच शौचालयाची दुरवस्था सुधारण्यात यावी, यासाठी पारोळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन माने यांना निवेदन देण्यात आले.
स्वच्छतेसाठी भाजप सरकारने प्रयागराजमधील कुंभमेळ्यात १ लाख २२ हजार स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे.
आज आपण एका शिक्षिकेची माहिती घेऊया, ज्यांनी आपल्या शाळेसह, परिसरात स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आणि शौचालय निर्मितीला प्रोत्साहन दिले. या शिक्षिकेचे नाव आहे श्वेता सिंग.
शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट भागात शहर पोलीस स्टेशन शेजारी महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव यांनी संयुक्तरित्या नागरिकांच्या सुविधेसाठी साकारलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे लोकार्पण शनिवार, 1 डिसेंबर रोजी सायंकाळी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट भागात शहर पोलीस स्टेशन शेजारी महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव यांनी संयुक्तरित्या नागरिकांच्या सुविधेसाठी साकारिलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे लोकार्पण शनिवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळील तिकीट खिडकीजवळ विटांनी भरलेला ट्रक दुपारी साडेबाराच्या दरम्यान उलटून चारजण जखमी झाले.
येथील गांधीनगर परिसरात नादुरुस्त शौचालयामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे .
मुंबई महापालिका उपनगरातील तीन प्रसूतिगृहे बंद करून तेथे खासगी सहभागातून प्रसूतिगृह चालविले जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार विविध सामाजिक विषयांवरील चित्रपट घेऊन येत आहे. गेल्या वर्षी आलेला 'टॉय़लेट एक प्रेमकथा' हा चित्रपट देखील अशाच एका सामाजिक विषयावर आधारित होता. आनंदाची आणि गौरवाची बाब म्हणजे हा भारतीय चित्रपट चीनमध्ये देखील 'टॉयलेट हीरो' या नावानेप्रदर्शित करण्यात आला आणि चीन येथे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या साडे तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकूण १ कोटी ६६ हजार कुटुंबांना शौचालयाचा अॅक्सिस दिल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हागणदारीमुक्त घोषित गावांचे सत्यापन केल्यापैकी ९५.६ टक्के गावे हागणदारीमुक्त, उर्वरित ४.४ गावांपैकीही ९५ टक्क्यांहून अधिक स्वच्छता आढळून आली.